shehnaaz gill and raghav juyal Sakal
मनोरंजन

Shehnaaz-Raghav: शहनाज-राघवचा हा रोमँटिक व्हिडिओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले 'तू खरंच...'

सध्या शहनाज गिल तिच्या 'किसी का भाई किसी की जान' या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Aishwarya Musale

बिग बॉस 13 ची चुलबुली शहनाज गिल सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री तिच्या 'किसी का भाई किसी की जान' या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये शहनाज खूपच बोल्ड लूकमध्ये पोहोचली होती. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

मीडियाशी बोलताना सलमान खानने शहनाजला मूव्ह ऑन करण्याचा सल्ला दिला. या अभिनेत्याच्या चर्चेनंतर राघव जुयाल आणि शहनाज यांच्या डेंटिंगच्या अफवा पसरत आहेत. यासोबतच दोघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

आता इन्स्टा बॉलीवूडनेही हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, शहनाज गिल फ्लोरल आउटफिट घालून नाचत आहे आणि प्रसिद्ध डान्सर राघव जुयाल देखील तिच्यासोबत दिसत आहे. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ निगम देखील व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसत आहे.

या तिघांच्याही व्हिडिओवर अभिनेत्रीचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत. सलमानची गोष्ट एकूण लवकरच मूव्ह ऑन करण्याचा सल्लाही चाहते अभिनेत्रीला देत आहेत. यासोबतच काहीजण राघवसोबत नाही तर दुस-यासोबत मूव्ह ऑन कर असंही म्हणत आहेत.

शहनाज गिल एक प्रसिद्ध गायिका आणि पंजाबी अभिनेत्री आहे. ती 'बिग बॉस 13' मध्ये सहभागी झाला होती. जिथून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याचवेळी शोमध्ये शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची मैत्री खूप आवडली होती. त्याचवेळी अभिनेत्याच्या मृत्यूनंतर शहनाज खूपच तुटली होती. पण आता अभिनेत्रीने त्याला सामोरे जायला शिकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT