actress shilpa shetty husband raj kundra involved in hit and run case in bangalore 
मनोरंजन

त्या गाडीचा मालक शिल्पाचा पती, बंगळुरमध्ये दिली होती धडक

सकाळ ऑनलाईन

मुंबई - बंगळुरमध्ये एका ऑडी चालकानं ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली होती. आता त्या कार चालकाची ओळख पटली आहे. मात्र त्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे ती गाडी त्यांची होती. दोन महिन्यांपूर्वी त्यानं ती दुस-याला विकली होती. त्यामागील कारणाचा उलगडा यानिमित्तानं झाला आहे. यामुळे त्या प्रकरणात राज कुंद्रा वाचले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

आता सध्या ज्याच्या नावावर ती कार आहे त्याचे नाव मोहम्मद साहब असे आहे. अपघाताप्रसंगी मोहम्मद साहब गाडी चालवत होते. पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर ते म्हणाले की, मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे घटनास्थळी थांबलो नाही. मी अपघातातील वाहनांची नुकसान भरपाई देण्यात तयार आहे. गेल्या  रविवारी बंगळुरुमध्ये एका ऑडी चालकाने ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. पोलिसांना या कारची ओळख पटली आहे. ही कार शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या नावावर असल्याचे रिपोर्ट्समध्ये दिसून आले आहे.

पोलिसांनी ती बाब प्रकाशात आणली आहे. कुंद्रा यांनी 2 महिन्यांपूर्वीच ही कार विकल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पोलीस म्हणाले, "संबंधित कार शिल्पा शेट्टीचे    पती राज कुंद्रा यांच्या नावावर असल्याचे मुंबईच्या RTO अधिकाऱ्यांकडून समजले. राज कुंद्रा यांनी दोन महिन्यांपूर्वी ती कार बंगळुरूच्या एका कार डिलरला विकल्याचे त्यांच्या मॅनेजरने सांगितले. वाहनाच्या कागदपत्रांमध्ये अजूनही राज कुंद्रा यांचे नाव होते. ते बदलले नव्हते.

रविवारी दुपारी 2.45 वाजता हा अपघात घडला होता. MH-02-BP-0010 क्रमांकाची ऑडी R8 ने सेंट मार्क्स मार्गावर एका हॉटेलजवळ एक ऑटोरिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. त्यानंतर वाहनचालक कार घेऊन पसार झाला होता.  ऑटो चालक  आणि दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली. तसेच  वाहनांची मोडतोड झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी कब्बन पार्क वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT