actress Shivali Parab birthday struggle career maharashtrachi hasya jatra famous skit sakal
मनोरंजन

Shivali Parab Birthday: कॉमेडी क्वीन शिवाली परबचा आज वाढदिवस.. बघा तिचे खळखळून हसवणारे खास स्किट

मोना डार्लिंग फेम अभिनेत्री शिवाली परबचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

Shivali Parab birthday: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले.

याच कार्यक्रमातील एक अवली कलाकार म्हणजे शिवाली परब. अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख तिने मिळवली आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्या विनोदाने आणि अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.

अशा शिवालीचा आज वाढदिवस.. त्या निमित्ताने शिवालीला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आज सोनी मराठी वाहिनीने शिवालीच्या काही गाजलेल्या स्किटचा व्हिडिओ शेयर केला आहे.

(actress Shivali Parab birthday struggle career maharashtrachi hasya jatra famous skit)

सध्या तीचं एक स्किट खूप गाजतय... ते म्हणजे 'शिवाली अवली कोहली..' या स्किट ने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यावरून अनेक मिम्स, गाणी व्हायरल झाली आहेत. तर तिचे मोना डार्लिंग हे स्किटही प्रचंड गाजले.

ग्रामीण भागातली शिवाली असो किंवा मंद पणाचा कहर करणारी 'शिवाली हे खरंय..' स्किट मधली ती असो. तिने कायमच प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे. तिची कितीतरी पात्रं प्रेक्षकांना इतकी भावली आहेत की आजची ओळख त्याच पात्रांनी होते.

हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याचाच एक व्हिडिओ आता सोनी मराठी वाहिनीने तिच्या वाढदिवसानिमित्त शेयर केला आहे. ज्यामध्ये तिचे भन्नाट स्किट आणि विनोद पाहायला मिळत आहे. हा विनोद सध्या चांगलाच गाजतो आहे.

शिवाली अत्यंत मेहनतनी इथवर पोहोचली आहे. एकेकाळी टीव्हीवर हास्य जत्रा पाहणारी शिवाली आज स्वतः गाजवते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT