shubhangi atre  Sakal
मनोरंजन

Shubhangi Atre: अंगूरी भाभीचे 19 वर्षांचे नाते तुटले, अभिनेत्री शुभांगी अत्रे पतीपासून झाली विभक्त

शुभांगी अत्रेचे नाव सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

'भाबी जी घर पर है' ची अभिनेत्री शुभांगी अत्रे, अंगूरी भाभी लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पियुष पुरीपासून विभक्त झाली आहे. शुभांगी आणि पियुष यांना एक मुलगीही आहे. दोघांनी 2003 मध्ये लग्न केले होते.

शुभांगीचा नवरा पियुष डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करतो. दोघांचेही लग्न इंदूरमध्ये झाले होते, जिथे त्यांचे कुटुंब राहत होते. एका मुलाखतीत याची पुष्टी करताना शुभांगीने सांगितले की, जवळपास एक वर्ष झाले आहे, आम्ही एकत्र राहत नाही आहोत. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला.

शुभांगी म्हणाली, आम्हाला समजले की आम्ही आमचे मतभेद सोडवू शकत नाही आणि म्हणून आम्ही एकमेकांना स्पेस देण्याचे ठरवले आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले." या निर्णयापर्यंत पोहोचणे अभिनेत्रीसाठी सोपे नव्हते.

ती म्हणाली, “हे अजूनही अवघड आहे. माझे कुटुंब हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आपले कुटुंब आपल्या सभोवताली असावे अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. इतक्या वर्षांचे नाते तुटले की त्याचा मानसिक आणि शारीरिक यावर परिणाम होतो.

मात्र, शुभांगी आणि पियुषने ठरवले आहे की, त्यांची १८ वर्षांची मुलगी आशीसाठी ते एकमेकांशी कोणतेही वैर ठेवणार नाहीत. कारण तिला आई आणि वडील दोघांचेही प्रेम मिळायला हवे. ती तिच्या आईसोबत राहते आणि तिचे वडील दर रविवारी तिला भेटायला येतात.

अंगूरी भाभी या व्यक्तिरेखेनंतर शुभांगी अत्रे पुन्हा एकदा चर्चेत आली. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेपासून तिने करिअरला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT