actress Shweta Mehendale video viral on the sets of satvya mulichi satavi mulagi  SAKAL
मनोरंजन

Shweta Mehendale: हातात जळता कापूर अन् उरी कल्लोळ.. मराठमोळ्या श्वेताचा थरारक Video बघाच

मराठमोळ्या श्वेता मेहेंदळेचा हा थरारक व्हिडीओ पाहून सर्वांना घाम फुटलाय

Devendra Jadhav

मराठी कलाकार त्यांच्या भुमिकेसाठी जीवाचं रान करत असतात हे आपण अनेकदा पाहिलंय. छोटीशी भुमिका असली तरीही मराठी कलाकार जीव ओतुन काम करत असतात.

मालिका असो सिनेमा असो की वेबसिरीज, मराठी कलाकार प्रत्येक माध्यमात स्वतःची छाप पाडतात. याचाच अनुभव नुकताच आलाय. अभिनेत्री श्वेता मेहेंदळेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. अभिनेत्रीचा हा थरारक व्हिडीओ पाहून सर्वांना घाम फुटलाय.

(actress Shweta Mehendale video viral on the sets of satvya mulichi satavi mulagi)

काय आहे श्वेता मेहेंदळेचा व्हिडीओ?

झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत इंद्राणीच्या भुमिकेत श्वेता मेहेंदळे झळकत आहे.

श्वेताने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात एका सीनसाठी श्वेताच्या हातात कापूर ठेवलं जातं आणि ते जळवलं जातं. हे पेटतं कापूर घेऊन श्वेताचा हा सीन शूट केला जातो.

एकुणच एका छोट्याश्या प्रसंगासाठी श्वेताने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. श्वेताच्या या थराराक व्हिडीओचं खुप कौतुक होतंय.

सातव्या मुलीची सातवी मुलगी

सध्या झी मराठी वरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका चांगलीच चर्चेत आहे. दिवसेंदिवस गूढ उलगडत जाणारी ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.

मालिकेत तितिक्षा तावडे, श्वेता मेहेंदळे, ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले असे लोकप्रिय कलाकार झळकत आहेत. मालिका झी मराठीवर १०.३० ला बघायला मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT