actress sriprada
actress sriprada  Team esakal
मनोरंजन

अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनानं निधन

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्याचा फटका अनेक सेलिब्रेटींना झाला आहे. यामुळे काही सेलिब्रेटींना जीवही गमवावा लागला आहे. बॉलीवू़डमधील प्रसिध्द अभिनेत्री श्रीप्रदा(actress sriprada) यांचं कोरोनानं निधन झाले आहे. तिनं एकेकाळी प्रख्यात अभिनेता धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्याबरोबर काम केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या कोरोनानं त्रस्त होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

80 आणि 90 च्या दशकात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा उमटविणारी सेलिब्रे़टी म्हणून श्रीप्रदा (actress sriprada) यांचे नाव घ्यावे लागेल. आग के शोले, बेवफा सनम पासुन टीव्ही क्षेत्रात अनेक हॉरर मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. 1989 मध्ये धर्मेंद्र आणि दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत आलेल्या बटवारा नावाच्या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. ए नाईटमेअर एट एल्म स्ट्रीटच्या हिंदी व्हर्जन खूनी मुर्दामध्येही त्यांनी दीपक पराशर आणि जावेद खान यांच्यासोबत काम केले होते. याशिवाय श्रीप्रदा (actress sriprada) हिंदी, साऊथ इंडियन आणि भोजपुरी चित्रपटांमधील 68 चित्रपटांमध्ये काम केले होते.

श्रीप्रदा (actress sriprada) यांच्या निधनाची बातमी सिने अँन्ड टीव्ही आर्टिस्ट्स असोशिएशननं (CINTAA) व्टिट करुन दिली आहे. त्यांनी श्रीप्रदा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्यांच्या जाण्यानं आम्हाला अतीव दु;ख झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सून होणार दाखल

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

मोठी बातमी! विद्यापीठाच्या परीक्षांचा बदलणार पॅटर्न; आता विद्यापीठ घेणार 60 गुणांची परीक्षा तर महाविद्यालयाच्या हाती 40 गुण

SCROLL FOR NEXT