actress swara bhaskar admire rahul gandhi said he wins heart by sharing his video on twitter 
मनोरंजन

एवढं प्रेम, राहुल गांधीबद्दल! कोण आहे 'ती'?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  काही दिवसांपूर्वी कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ मध्ये एका विद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिध्द झाला होता. विद्यार्थी राहुल यांना सर म्हणाले होते. त्यावर त्यांनी मला सर म्हणू नका. राहुल म्हणा असे सांगितले होते. राहुल गांधी यांची ती एक लोकप्रिय सभा होती असे म्हणावे लागेल. त्यावेळी अभिनेत्री स्वरा भास्करनं त्यांचे कौतूक केले होते. ती राहुल यांना क्युट म्हणाली होती. यासगळ्या प्रकाराची सगळीकडे खूप चर्चाही झाली होती. आताही स्वरानं राहुल यांच्याविषयी एक व्टिट केलं असून ते चांगलेच चर्चेत आले आहे.

आपल्या ठाम प्रतिक्रियेसाठी स्वरा भास्करची खास ओळख आहे. ती नेहमी वादाच्या भोव-यात सापडणारी सेलिब्रेटी आहे. अशावेळी तिनं अनेकांचा वाद ओढावून घेतला आहे. तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात कॉग्रेसच्या अनुषंगानं आणि आजच्या राजकारणाच्या बाबतीत तिनं आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याला सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.

स्वरानं लिहिलं आहे की, जे कोणी आंधळे भक्त आहे त्यांनी कितीही राहुल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ केली, आरोप प्रत्यारोप केले तरी त्या माणसांतील चांगुलपणा हा काही लपून राहणार नाही. या माणसाचा चांगुलपणा हा नेहमी आपण पाहत आलो आहे. त्यानं सर्वांना जिंकुन घेतले आहे. राहुल गांधी हे धैर्य, प्रामाणिकपणा, माणुसकी या सा-या गुणांचा परिपाक आहे. असे म्हणावे लागेल. त्यांना आणखी बळ मिळो ही प्रार्थना.

वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया देण्यासाठी स्वराचे नाव घ्यावे लागेल. सोशल मीडियावरही ती प्रसिध्द आहे. विशेषत व्टिटर आणि इंस्टावर ती अधिक अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. ज्यावेळी तिनं दिग्दर्शक अनुराग कश्यप, तापसी पन्नुच्या बाजुनं व्टिट केलं होतं त्यामुळे ती ट्रोल झाली होती. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवस बंद; दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Latest Marathi News Live Update: सोमवार पेठेतील हॉटेलमध्ये आगीत तरुणाचा मृत्यू

Uruli Kanchan : दारू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांची धडक कारवाई; सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त!

फक्त संपत्तीतच नाही तर वयानेही विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ; दोघांच्या वयात किती आहे अंतर?

SCROLL FOR NEXT