actress Taapsee Pannu troll for wearing Goddess Lakshmi necklace with a deep neck gown  Esakal
मनोरंजन

Taapsee Pannu Trolled: 'हिंदू देवतांचा अपमान करतांना लाज नाय वाटत का?', Taapsee Pannuला नेटकऱ्यांनी झाडलं

सकाळ डिजिटल टीम

Taapsee Pannu Trolled: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या दमदार अभिनयाव्यतिरिक्त अनेकदा इतरही काही वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत येते. ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते.

ती अनेकदा तिच्या वागण्यामुळे ट्रोर्लसच्या निशाण्यावर असते. तर तापसीही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत असते. मात्र आज तापसी वेगळ्याच कारणाने ट्रोल झाली आहे. तिने असं काही केलयं जे नेटकऱ्यांना मुळीच आवडलेलं नाही.

नेटकऱ्यांनी तापसी पन्नूवर हिंदू देवीचा अपमान केल्याचा आरोप केला आणि बरेचं ट्रोलही केलं आहे. तापसी पन्नूने नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिच्या रॅम्प वॉक केला. त्याचे व्हिडिओही सोशल मिडियावर बरेच व्हायरल झाले.

त्यातच तिनं काल तिच्या सोशल मिडियावर तिचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती याच ड्रेसवर पोज देतांना दिसली. या फोटोत तिनं गळ्यात नेकलेस घातला होता. मात्र हा नेकलेस तिच्यासाठी अडचणीचा ठरला आणि लोकांनी तिला ट्रोल केलं.

खरतरं, तापसी पन्नूने ने लॅक्मे फॅशन वीकमध्ये लाल रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने नेकलेस घातला होता ज्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती होती.हे पाहून यूजर्स संतापले आणि त्यांनी तापसीवर देवीचा अपमान केल्याचा आरोप केला.

काही मिनिटांतच तापसी पन्नूच्या सोशल मीडिया पोस्टवर संतप्त आणि आक्षेपार्ह कमेंटचा वर्षाव झाला. इतकच नाही तर नेटकऱ्यांनी तापसी पन्नूची पार लाजच काढली.

एका यूजरने लिहिले आहे की, अश्लील फोटोंमध्ये हा मां लक्ष्मीचा अपमान आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'तापसीला लाज वाटली पाहिजे. हे खुप वाईट आहे. सेलिब्रिटी म्हणून तुम्ही कोणत्याही धर्माच्या प्रतीकाचे प्रतिनिधित्व कशा प्रकारे करतात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. अशा अनेक कमेंट तिच्या फोटोंना नेटकऱ्यांनी केल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT