tejaswini pandit: आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाची उंची गाठलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit) हीने नुकतीच एक मोठी बातमी दिली आहे. तेजस्विनी कायमच चर्चेत असते. आजवर तिने अनेक मालिका आणि चित्रपट केले आहेत. काही दिवसांपूर्वी ती 'रानबाजार'या वेब सिरीजमुळे चर्चेत आली होती. यामध्ये तिच्या बोल्ड सिन वरुन बरीच टीका देखील टीका झाली. पण तिनेही सडेतोड उत्तर देत सर्वांचे तोंड बंद केले होते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खास आहे. ती एका मोठ्या चित्रपटात झळकणार आहे. यासंदर्भात तिने एक पोस्ट केली आहे. (actress tejaswini pandit shared poster of prabhas adipurush movie she also playing important role ) (tejaswini pandit movies)
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने 'आदिपुरुष' या बहुचर्चित चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आरंभ.. 2 ऑक्टोबरला आमच्यासोबत चित्रपटाचा टीझर बघायला तयार राहा..' या पोस्टचा अर्थ असा की की तेजस्विनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिला या भव्य दिव्य चित्रपटात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
'आदिपुरुष' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा आहे. त्याच्या पोस्टरलाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपट कधी रिलीज होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 'बाहुबली' नंतर येणारी सर्वात मोठी आणि भव्य कलाकृती असेल. या चित्रपट 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास प्रमुख भूमिकेत असणार आहे. नवरात्रीत म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत 'आदिपुरुष'चे दिग्दर्शन करत आहेत. आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितही या चित्रपटात झळकणार असल्याने मराठी प्रेक्षकांसाठी मोठी अभिनयाची गोष्ट बनली आहे. प्रभास या चित्रपटात प्रभू रामच्या भूमिकेत झळकणार असून क्रिती सनन आणि सनी सिंग हे कलाकारही प्रमुख दिसणार आहेत. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.