Tejaswini Pandit SAKAL
मनोरंजन

Tejaswini Pandit: जो घर से निकला ही नहीं ! तेजस्वीनीनं परत कुणाला टोमणा मारला?

तेजस्विनीच्या एका ट्विटची सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे.

Vaishali Patil

Tejaswini Pandit: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे मनोरंजन विश्वातील चर्चेतलं नाव आहे. तेजस्विनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तेजस्विनी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही सर्वांना वेडं लावते. मात्र आपल्या अभिनयासोबतच तेजस्विनी आपल्या वक्तव्यामुळेही चर्चेत असते. ती बऱ्याच मुद्यावर ती मतं व्यक्त करत असते.

नुकतच तिने खासदर अन् आमदारांच्या निलंबनावर ट्विट केलं होते आता पुन्हा तेजस्विनीच्या एका ट्विटची सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे.

तिने कुणाचेही नाव न घेता एक शायरी पोस्ट केली आहे. मात्र नेटकऱ्यांनी या ट्विटचा संबधही राजकारणाशी जोडला आहे.

तेजस्विनीने एक्स अकाउंटवर पोस्ट करत लिहिले आहे की, "मंज़िल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है, जो घर से निकला ही नहीं!". यासोबत तिने #IYKYK #thankyou #प्रश्नविचारतरहा असे हॅशटॅग वापरले आहे.

भटकंती करूनच तुम्हाला जिथे जायचंय तिथे तूम्ही पोहोचू शकता, पण जे आजवर घराच्या बाहेरच पडले नाहीत, ते भरकटलेले असतात असं काहीतरी तेजस्विनीला बोलायचे आहे.

मात्र तेजस्विनीने ही पोस्ट कुणासाठी लिहिली आहे सांगितलेले नाही त्यामुळे अनेकांनी या पोस्टचा संबंध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लावला आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, 'खरे आहे. वाह ताई वाह, चांगला टोमणा मारला'. तर दुसऱ्याने लिहिले आहे, 'अरे, डायरेक्ट उद्धव ठाकरेंना टोमणा??' तर एका नेटकऱ्यांने लिहिले, आज एकदम उबाठा वर निशाणा? तर एकानं लिहिले, 'सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजेत'.

सध्या तेजस्विनीच्या पोस्टची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. मात्र तिने या पोस्टमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT