Tunisha Sharma esakal
मनोरंजन

Tunisha Sharma : तुनिषा शर्माने मागे सोडली कोट्यावधींची संपत्ती, जाणून घ्या अभिनेत्रीची नेट वर्थ

दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिका निभावलेली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन काल आत्महत्या केली

सकाळ डिजिटल टीम

दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिका निभावलेली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन काल आत्महत्या केली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच दोघंच ब्रेकअप झालं होतं. यामुळे तुनिशा मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. अनेक भूमिकांमधून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तर कोट्यावधींची संपत्तीदेखील कमावली. (Actress Tunisha Sharma Net Suicide Worth Bollywood )

मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषाला डान्स आणि अॅक्टिंगची खूप आवड होती. तिने याचं क्षेत्रात आपले करिअर करायचे ठरवले. छोट्याशा कारकिर्दीत तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. तिने केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’ या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. 'फितूर', 'बार बार देखो', 'कहानी 2', 'दबंग 3' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.

तिच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तर तिची आई, भाऊ आणि बहीण चंदीगडला राहतात. तुनिषाचाही जन्म चंदीगड येथेच झाला होता. तेथे तिचे शालेय शिक्षणही झाले आणि नंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली.

एका मीडिया रिपोर्टनुसार तुनिषाची संपत्ती ही २ मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ १५ कोटींची आहे. अल्पावधीतच यशाची शिखरे गाठणारी तुनिषा शर्मा तिच्या स्वत:च्या आलिशान घराची मालकिन होती. तुनिषाच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिशान घरासोबतच तुनिषा शर्मा अनेक आलिशान गाड्यांचीही मालकीण होती.

तुनिषा मागच्या काही दिवसांपासून नैराश्यात होती आणि तिने त्यातूनच जीवन संपवलं अशीही माहिती समोर आली. तर ‘फ्री प्रेस जर्नल’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली. पोलीस तिच्या आत्महत्येचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT