Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फीकडून चाकणकरांच कौतुक तर चित्रा वाघ याचं..ट्विट व्हायरल

Vaishali Patil

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात टोकाचा वाद सुरु आहे. चित्रा वाघ या उर्फीवर जोरदार टिका करतांना दिसतात. तर दुसरीकडे उर्फीही काही शांत बसल्याचं दिसत नाही.

ती रोज काही ना काही नवीन ट्विट करत चित्रा वाघ यांना सुनावत असते. त्याच बरोबर ती तिची अतरंगी फॅशनही दाखवत असते. या प्रकरणानंतरही तिने तिचे फॅशन सुरुच ठेवली आणि ती व्हिडिओ बनवते आणि पोस्टही करते. त्यातच आता उर्फीचं एक ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे.

रुपाली चाकणकर यांनी केलेलं एक ट्विट शेअर करत उर्फीनं चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. यात रुपाली चाकणकर यांनी उर्फीनं केलेल्या तक्ररारीची एक प्रत शेअर केली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असल्याचं म्हटंल आहे.

तिने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलयं, "लाखो बलात्काराची प्रकरणं प्रलंबित असली तरी हे राजकारणी मीडियात जाऊन जाहीरपणे एखाद्या महिलेला मारण्याची धमकी देताय त्याच कारण म्हणजे तिने शरीरावर काय घातलयं.."

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरूध्द सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घातल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घातल्या प्रकरणी मॉडेल उर्फी जावेदचा जबाब मुंबईतील आंबोली पोलिसांनी नोंदविण्याला मात्र तिनं पुन्हा एकदा तिच्या फॅशनचा अविष्कार करत व्हिडिओ शेअर केला आणि ती तिची फॅशन चालूच ठेवणार असं दाखवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT