actress urmila kanetkar kothare shared video about shooting in heavy hit summer on tujhech mi geet gaat aahe set said injustice sakal
मनोरंजन

Urmila Kothare: आम्ही उन्हात आणि दिग्दर्शक पंख्याखाली, हा कसला न्याय.. उर्मिला कोठारेचा व्हिडिओ व्हायरल

रणरणत्या उन्हात शूट करणाऱ्या उर्मिला चा थेट सवाल..

नीलेश अडसूळ

Urmila Kanetkar kothare: मराठी मनोरंजन विश्वातील एक दमदार अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर- कोठारे. 'शुभमंगल सावधान' या चित्रपटातून तिने चित्रपट विश्वात प्रवेश केला आणि उर्मिला कानेटकर हे नाव चांगलंच गाजलं.

तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपट केले. सध्या ती स्टार प्रवाह वरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत नुकतीच तिने मंजुळा सातारकर सातारकर म्हणून एंट्री घेतली आहे.

सध्या मुंबईत कडाख्याचं ऊन पडलं आहे, आणि अशा रणरणत्या उन्हात त्यांचे चित्रीकरण सुरू आहे. पण एकीकडे उर्मिला उन्हात असताना दिग्दर्शक मात्र सावलीत पंखा लावून बसला आहे. हाच व्हिडिओ शेयर करत उर्मिलाने एक प्रश्न विचारला आहे.

(actress urmila kanetkar kothare shared video about shooting in heavy hit summer on tujhech mi geet gaat aahe set said injustice)

उर्मिलाने 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेचे शूटींग करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अगदी रणरणत्या उन्हात त्यांचे चित्रीकरण सुरू आहे. ऊन सहन होत नसल्याने उर्मिलाने डोळ्यांवर गॉगल घातला आहे तर डोक्यावर ओढणी गुंडाळली आहे.

या व्हिडीओमध्ये उर्मिला म्हणते की, ;हा आहे तळपता सूर्य.. ज्याच्याखाली आम्ही शूटींग करत आहोत.. एप्रिल महिन्यात आऊटडोअरमध्ये शूटींग करायला आलेली मंजुळा.. साधारण अॅक्शन आणि कटच्या नंतर मी अशी दिसते.'

पुढे ती कॅमेरा दिग्दर्शकाकडे नेते आणि म्हणते की, 'हेआमचे दिग्दर्शक.. हे आम्हाला उन्हात शूटींग करायला लावून स्वत: मात्र छपराखाली बसले आहेत. तेही पंखा लावून.. हा आमच्यावर अन्याय आहे की नाही.'

ह्या व्हिडिओला तिने एक कॅप्शन ही दिले आहे. 'हा अन्याय आहे की नाही? कमेंटमध्ये सांगा. स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे पाहायला विसरु नका,' असे उर्मिलाने म्हटले आहे. उर्मिलाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या असून हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT