urvashi rautela sakal
मनोरंजन

उर्वशी म्हणते टायटॅनिकच्या हिरोनं माझं कौतुक केलं, फॅन्स म्हणतायेत...

उर्वशीने केलेल्या दाव्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय

सकाळ ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय पहायला मिळते. ज्यामूळे तिचा फॅन क्लबसुद्धा तितकाच मोठा आहे. तिच्या नव्या लूक किंवा फोटोची चाहते आतुरतेने वाट बघत असतात. यावेळी उर्वशी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. तिचा कान्समधला लुकसुद्धा चाहत्यांना प्रचंड आवडला. पण या दरम्यान उर्वशीने केलेल्या दाव्यामूळं ती चांगलीचं तोंडावर पडली आहे.

झालं असं, उर्वशीने दावा केला की, हॉलिवूड सुपरस्टार लिओनार्डो डी कॅप्रिओने कान्स २०२२ मध्ये तिची खूप प्रशंसा केली. इतकचं नाही तर लिओनार्डो डी कॅप्रिओने टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून तिचं कौतूकसुद्धा केलं. पण उर्वशीची ही गोष्ट यूजर्सला काही पटली नाही, ज्यानंतर उर्वशीला ट्रोलींगचा सामना करावा लागला. नेटिझन्सना तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं अवघड जातयं. त्यामूळं अनेकांनी तिला खोटारडी म्हणायला सुद्धा सुरुवात केली आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने म्हंटल की, टायटॅनिक चित्रपटातील अभिनेत्याशी भेटणे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. लिओनार्डो डिकॅप्रियोकडून प्रशंसा मिळाल्यानंतर मी घाबरले. मी खूप भावूक झाले होते आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येत होते. एक अतिशय टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून त्यांनी माझी प्रशंसा केली.'

उर्वशीने मोठ्या उत्साहाने हॉलिवूड अभिनेत्याला भेटल्याबद्दल सांगितले. पण, नेटकऱ्यांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. एका ट्विटर युजरने लिहिले, 'मी उर्वशी रौतेलाचे खरोखर कौतुक करतो, कारण तिला पर्वा नाही की, ती खोटे बोलत आहे. ती फक्त खोटे बोलत आहे.

दुसर्‍या युजरने कमेंट केली की, 'लिओनार्डोने नक्कीच उर्वशी रौतेलाचा 'व्हर्जिन भानुप्रिया', 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'हेट स्टोरी 4', 'पागलपंती' सारख्या चित्रपटांमधला तिचा उत्कृष्ट अभिनय पाहिला असेल.' काहींनी तर फिल्म फेस्टिव्हलमध्ये लिओनार्डो आला का नाही याच गोष्टीवर शंका उरस्थित केली.कारण फेस्टिव्हलमध्ये लिओनार्डोचा रेड कार्पेटवर एकही फोटो दिसला नाही.

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिओनार्डो गुरुवारी कान्स २०२२ मध्ये 'अम्फर चॅरिटी गाला'मध्ये रॉबर्ट डी नीरोशी बोलताना दिसला.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने यावर्षी कान्समध्ये पदार्पण केले आहे. उर्वशी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटींसोबत पोहोचली. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवरही ती थक्क झाली. उर्वशी रौतेलाबद्दल सांगायचे तर, तिला 2015 मध्ये मिस दिवा युनिव्हर्सचा ताज मिळाला होता. उर्वशीने 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फॉरएव्हर यंग आणि एल्विसच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड सुटणार...? बीड न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान, हायकोर्टात दोषमुक्तीचा अर्ज

धक्कादायक!' साेलापुरात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू'; पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नातेवाइकांकडून तक्रार

Mahadevi Elephant : ‘महादेवी हत्तीण’ प्रकरणी मुंबईतील बैठकीत तीन मुद्यांवर होणार चर्चा, प्रशासन कायदेतज्ज्ञांच्या संपर्कात

Eknath Shinde: कार्यकर्त्यांना ‘ते’ सालगडी समजायचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे यांच्यावर टीका

Latest Maharashtra News Updates : रत्नागिरीत १७ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश

SCROLL FOR NEXT