actress veena kapur murdered by her own son juhu woman's muder case  sakal
मनोरंजन

Veena Kapoor Murder: मुलानेच केली अभिनेत्री वीणा कपूरची हत्या! मृतदेह फेकला..

संपत्तीच्या वादावरून अभिनेत्रीचा मुलानेच केला खून..

नीलेश अडसूळ

जुहू येथील एका महिलेची चक्क तिच्याच मुलाने हत्या केल्याचे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. पण महिला म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कपूर असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वासाठी ही फारच मोठी धक्कादायक बातमी आहे.

(actress veena kapur murdered by her own son juhu woman's muder case )

टीव्ही आणि चित्रपटांमध्ये वीणा यांनी अनेक भूमिका केल्या आहेत. त्यांचे वय ७४ वर्षे होते. एका महिलेचा मृतदेह हत्या करून फेकण्यात आल्याचा प्रकार जुहू पोलिसांनी उघड केला होता. याची बरीच चर्चाही झाली, अखेर या मृतदेहाची ओळख पातळी असून त्या अभिनेत्री वीणा कपूर होत्या. ही हत्या त्यांच्या मुलानेच केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संपत्तीसाठी ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह नदीत फेकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खेद व्यक्त करणारी आणि वीणा यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट अभिनेत्री नीलू कोहली यांनी शेयर केली आहे.

वीणा कपूर यांना दोन मुलं आहेत, त्यापैकी एक यूएसएमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर दुसऱ्या मुलाचे नाव सचिन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कपूरनेच ही हत्या केली असून या प्रकरणी जुहू पोलिसांनी त्याला आणि त्यांच्या नोकराला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT