Adah Sharma On The Kerala Story Character esakal
मनोरंजन

Adah Sharma Birthday : 'फातिमा मला अजुनही शांतपणे झोपू देत नाही!'

केरळ स्टोरीमधून मोठी लोकप्रियता मिळवणाऱ्या अदाचा आज जन्मदिवस आहे. सोशल मीडियावर अदा ही गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adah Sharma On The Kerala Story Character : द केरळ स्टोरीमध्ये फातिमाची भूमिका करणारी अभिनेत्री अदा शर्मा ही सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियावर अदाच्या नावाची चर्चा आहे. अदानं केरळ स्टोरीमध्ये शालिनी उन्नीकृष्णन असणारी अदा धर्मांतरानंतर फातिमा झाली. तिचा जीवघेणा प्रवास सुरु होतो. चित्रपटातून अदानं ती भूमिका प्रभावीपणे साकारली आहे.

केरळ स्टोरीमधून मोठी लोकप्रियता मिळवणाऱ्या अदाचा आज जन्मदिवस आहे. सोशल मीडियावर अदा ही गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आली आहे. केरळ स्टोरीची बॉक्स ऑफिसवर चाललेली दमदार कमाई ही निर्मात्यांसाठी आनंदाची बाब आहे.

या चित्रपटावर कौतूकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर टीकाही होत आहे. हा चित्रपट प्रोपगंडा असून त्यातून दोन समुहामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अदानं एका मुलाखतीमध्ये तिची भूमिका आणि केरळ स्टोरीतील प्रवासाविषयी सांगितले आहे. त्यात तिनं आपण आजवर केलेली सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचे म्हटले आहे. जी लोकं या चित्रपटाला नावं ठेवत आहे त्यांना मला सांगावेसे वाटते की, त्यांनी गुगलवर जाऊन इसिस आणि जिहाद टाईप करावे. म्हणजे निर्माते, दिग्दर्शक यांना काय सांगायचे आहे हे तुम्हाला कळेल. हा चित्रपट कुणाच्या विरोधात नाही तो प्रवृत्तीवर भाष्य करणारा चित्रपट आहे.

Adah Sharma Birthday

केरळ स्टोरीचा विषय फारच गंभीर असल्यानं त्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. आतापर्यत तामिळनाडू, पश्चिम बंगाल दोन्ही राज्यांमध्ये प्रदर्शनास विरोध केला आहे. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अदानं मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये परखडपणे तिची मतं मांडली आहेत. अदा म्हणते ही भूमिका करताना मला खूपच टेन्शन होतं. मला या भूमिकेनं झोपू दिले नाही. मी खूपच अस्वस्थ असल्याची प्रतिक्रिया अदानं दिली आहे.

केरळ स्टोरी लोकांना आवडतो आहे हे पाहून आनंद होतो आहे. लोकांना सद्यस्थितीमध्ये काय होते आहे हे जाणून घेण्यास रस आहे हे यानिमित्तानं दिसून आले आहे. तुम्ही कसेही काम केले तरी लोकं नाव ठेवणारच. आपण आपले काम करत राहावे, ज्यांना त्यावरुन कौतूक करायचे तर ते करतीलच. टीकाकारांना फार गांभीर्यानं घेऊ नये. असे अदाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन यांना, इतर चौघांसह १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातून नेले

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT