soham bandekar 
मनोरंजन

आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकरचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित २०५ या मालिकेच्या निर्मात्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता सोहम बांदेकर स्टार प्रवाहच्याच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. सोहमला अभिनयाची आवड होतीच मात्र निर्मात्याची जबाबदारी पार पाडत असताना अभिनयाची आवड द्विगुणीत होत गेली. इतर कलाकारांना सेटवर सीन करताना पाहून हा सीन मी कसा केला असता याचा सोहम अभ्यास करायचा. ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या निमित्ताने अभिनय पदार्पणाचा हा सुवर्णयोग जुळून आला आहे. पीएसआय जय सुवर्णा दिक्षित असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून सोहम सध्या या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतोय.  

नवे लक्ष्य मालिकेतील भूमिकेबद्दल सांगताना सोहम म्हणाला, "पोलिसांचं कार्य शब्दात मांडता येणारं नाही. त्यामुळे या रिअल हिरोंना साकारणं अतिशय आव्हानात्मक आहे. सीनसाठी वर्दी चढवल्यानंतर एक वेगळंच स्फुरण चढतं. या वर्दीची एवढी ताकद आहे की थकवा अजिबात जाणवत नाही. मी पीएसआय जय ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. पीएसआय जयला लहानपणापासूनच पोलीसी वर्दीचं पॅशन आहे. स्त्रियांचा प्रचंड आदर असलेला, वडिलांचं चॅलेंज स्वीकारुन एमपीएससी टॉप करणारा असा हा जय. जयचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच त्याच्या नावातही तो आईचं नाव लावतो."

"खऱ्या आयुष्यातही मला माझी आई खुप जवळची आहे. आई-बाबा दोघांचाही खंबीर पाठिंबा असल्यामुळे मी हे आव्हान स्वीकारु शकलो.  गेले वर्षभर मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा उपयोग जयची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला होतोय. उदय सबनीस, शुभांगी सदावर्ते, अमित डोलावत, अभिजीत श्वेतचंद्र अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. लक्ष्यवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम ‘नवे लक्ष्य’लाही मिळेल याची मला खात्री आहे," असा विश्वास त्याने व्यक्त केला. 

नवे लक्ष्य ही मालिका ७ मार्चपासून दर रविवारी रात्री १० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT