Farhan Akhtar,Shibani Dandekar, Adhuna Bhabani Google
मनोरंजन

फरहानच्या लग्नानंतर पूर्वाश्रमीची पत्नी अधुनाची 'ती' पोस्ट चर्चेत

अधुनासोबत तब्बल १६ वर्ष संसार केल्यानंतर फरहाननं विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

प्रणाली मोरे

फरहान अख्तर(Farhan AKhtar) आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) यांनी तब्बल चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर या दोघांचं लग्न ख्रिश्चन पद्धतीत पण थोड्या हटके अंदाजात पार पडलं. या लग्नाला दांडेकर-अख्तर कुटुंबातील निकटवर्तीय हजर होते. तसंच सिने इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींनीही या लग्नाला आवर्जुन हजेरी लावली होती. हा लग्नसोहळा लक्षात राहिला तो मेहेंदी,हळद अशा वेगवेगळ्या समारंभांनी. तसंच हृतिक आणि फरहाननं केलेला डान्स,शंकर महादेवन यांनी गायलेलं गाणं आणि वडील तसंच सासरे जावेद अख्तर यांच्यासोबतच्या शिबानीच्या डान्सनीही हे लग्न अधिक अविस्मरणीय ठरलं.

पण फरहान-शिबानीचं हे लग्न अधुना भबानीला मात्र भलतंच महाग पडतंय. अधुना-फरहाननं २००० साली लग्न केलं आणि २०१६ मध्ये दोघे विभक्त झाले. अधुना ही सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आहे. त्यामुळे अर्थातच फरहान आणि तिची या सेलिब्रिटी वर्तुळातचं त्यावेळी ओळख झाली,त्यांच्यात प्रेम झालं अन् फरहाननं आपल्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या अधुनासोबत प्रेमविवाह केला. त्यांना दोन मुली आहेत. पण संगनमतानं विभक्त झाल्यानंतर त्याचं नात बिनसलं नाही तर आजही ते चांगले मित्र आहेत. फरहान आयुष्यात शिबानीसोबत पुढे गेला असला तरी अधुना आजही एक आई म्हणून आपलं कर्तव्य निभावताना दिसत आहे. तीनं अद्याप लग्न केलेलं नाही.

पण तरिही फरहान-शिबानीच्या लग्नानंतर तिला सोशल मीडियावर उगाचच ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे कंटाळून आता अधुनानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे,ज्यात तिनं म्हटलं आहे की जर मला त्रास द्यायचा थांबवला नाही तर मी ब्लॉक करेन. या पोस्टवर अधुनाला सपोर्ट करीत अभिनेत्री प्रीटी झिंटा आणि मनिषा कोईरालानं प्रतिक्रिया दिली आहे. तर अधुनानं ही पोस्ट खास ट्रोलर्सला धमकावण्यासाठी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Rain Update : साताऱ्यासह विविध भागांत दमदार पाऊस; रस्‍ते जलमय; उत्तर खटाव परिसरात नदी, नाले प्रवाहित, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

'इतकं घाणेरडं गाणं...' शाहरुख-ऐश्वर्याच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक पडला महाग, हुमा कुरेशी ट्रोल

Eleventh Admission : आजपासून अकरावीची पहिली विशेष फेरी; पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक ६ जुलैला होणार जाहीर

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

SCROLL FOR NEXT