Adinath kothare post on Mumbai-Pune old Express Way Instagram
मनोरंजन

Adinath Kothare:'मुंबई-पुण्याचा जुना घाट म्हणजे...',एक्सप्रेस-वे संदर्भातील पोस्टमुळे आदिनाथ चर्चेत

मुंबई-पुण्याच्या जु्न्या एक्सप्रेस वे संदर्भात आदिनाथनं केलेली पोस्ट तिथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला भूतकाळात डोकावण्यास भाग पाडेल.

प्रणाली मोरे

Adinath Kothare:आदिनाथ कोठारे सध्या मराठीसोबत हिंदीतही काम करताना दिसत आहे. रणवीर सिंगच्या '83' सिनेमात त्यानेही आपली दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलं होतं. अभिनयासोबतच आदिनाथ दिग्दर्शनातही नाव कमावतोय अन् वडील महेश कोठांरे यांच्या निर्मिती व्यवसायातही लक्ष घालताना दिसत आहे.

आदिनाथ सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय पहायला मिळतो. वेगवेगळ्या विषयांवर तो पोस्ट करत असतो. अगदी तो विषय मनोरंजन क्षेत्राशी निगडित नसला तरी. आता पुन्हा एकदा भूतकाळात डोकावत त्यानं एक पोस्ट केली आहे,जी वाचल्यावर प्रत्येकजण कदाचित त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. काय म्हणाल आहे नेमका आदिनाथ? चला जाणून घेऊया.(Adinath kothare post on Mumbai-Pune old Express Way)

आदिनाथची ही पोस्ट मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या जुन्या घाटाविषयी आहे. त्यानं याविषयी लिहिताना या प्रवासातल्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. तो म्हणाला,''लहानपणी मुंबई पुण्याचा जूना घाट चढत असताना माझी आज्जी सतत देवाचं नाव घेत रहायची. प्रत्येक वळणावर तीची श्रद्धा आणी तीची काळजी वाढत जायची. मी मागच्या सीटवर तीच्या आणि आईच्या मधे बसायचो. मला ती सगळी स्तोत्र पाठ झाली होती आणी मी पण गम्मत म्हणून तीच्या सोबत म्हणायचो''.

पुढे आदिनाथनं लिहिलं आहे,''आज आज्जी खूप म्हातारी झालीये आणी तिला ती स्तोत्र कदाचीत आठवतही नसतील. पण तो घाट आजही आहे. रस्ता जरा सोयीचा झाला असला तरी ती वळण तशीच आहेत. त्या वळणांवरून जाताना आज गाडीत आज्जी नसते. पण ती स्तोत्र आपोआप आठवतात. मी मनातल्या मनात म्हणतो. अचानक खूप सुरक्षित वाटायला लागतं. आपल्या आज्जीच्या आणि आईच्या कुशीत बसून मी प्रवास करतोय असं वाटतं. आयुष्याच्या प्रत्येक घाटात मला हा भास होतो''.

आदिनाथ काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चेत होता ते पत्नी उर्मिला कोठारे आणि त्याच्यातील वादामुळे. अर्थात वादाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी सुरू आहेत अशी बातमी काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली होती. स्वतः आदिनाथनं यात काही तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. पण उर्मिलानं मात्र यावर अद्याप बोलणं टाळलं आहे. असो,आदिनाथनं लहानपणीच्या आठवणींची शेअर केलेली ही पोस्ट मात्र अनेकांना भूतकाळात घेऊन गेली असणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT