adipurush 8th day box office collection prabhas saif ali khan om raut kriti sanon  SAKAL
मनोरंजन

Adipurush Box Office: खतम, टाटा, गुडबाय! ८ व्या दिवशी सिनेमाने फक्त इतके पैसे कमावले

आदिपुरुषचा लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय.

Devendra Jadhav

Adipurush 8th Day Box Office Collection News: आदिपुरुष सिनेमा रिलीजआधी चर्चेत होता. रिलीजनंतर मात्र सिनेमाने बरेच वाद ओढून घेतले. सिनेमातील VFX, डायलॉग, अभिनय अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या.

आदिपुरुष सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण चित्र उलटंच दिसलं.

आदिपुरुषने पहिले काही दिवस वगळता बॉक्स ऑफिसवर यथातथा कामगिरी केली. आता आदिपुरुषचा लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय.

(adipurush 8th day box office collection prabhas saif ali khan om raut kriti sanon

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने शुक्रवारी दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला. पण आता मात्र आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर जोरदार संघर्ष करत आहे.

ओम राऊत चित्रपटाने पहिल्या आठवड्यात भारतातील सर्व भाषांमध्ये सुमारे ₹260 कोटी कमावले होते आणि शुक्रवारी त्यात फक्त ₹3.25 कोटींची भर पडली.

बॉक्स ऑफिस रिपोर्ट

Sacnilk.com वरील अहवालानुसार, आदिपुरुषने भारतात आठव्या दिवशी सर्व भाषांमध्ये अंदाजे ₹3.25 कोटी कमाई केली. यामुळे त्याचे एकूण देशांतर्गत कलेक्शन सुमारे ₹263.15 कोटी झाले आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, शुक्रवारी हिंदी भाषेतील आवृत्ती पाहण्यासाठी ११.२० टक्के थिएटर व्यापले होते.

या चित्रपटाने दोन दिवसांपूर्वीच जगभरात ₹400 कोटींचा गल्ला पार केला होता. आता दुसऱ्या वीकेंडमध्ये हा चित्रपट काही सुधारणा दाखवतो कि थिएटरमधून गाशा गुंडाळतो हे पाहायचे आहे.

दरम्यान नेपाळने शुक्रवारी 'आदिपुरुष' वगळता सर्व हिंदी चित्रपट दाखवण्याची परवानगी दिली आहे. 'आदिपुरुष' चित्रपटाने सीते मातेचे 'भारत की बेटी' असे वर्णन केल्यानंतर वाद सुरू झाला.

अलीकडेच नेपाळने सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. पण आता मात्र आदिपुरुषला वगळता काठमांडूमधील अनेक सिनेमागृहांनी आता हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT