Kriti Sanon Esakal
मनोरंजन

Kriti Sanon: पहिल्या फोटोशूटनंतर घरी येऊन ढसाढसा रडलेली क्रिती.. अनेक वर्षांनी केला यामागच्या कारणाचा खुलासा

क्रिती सनन सध्या 'आदिपुरुष' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमातील सीतेच्या भूमिकेमुळे सध्या ती चर्चेत पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

Kriti Sanon: क्रिती सनन सध्या तिच्या 'आदिपुरुष' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात ती प्रभास सोबत दिसणार आहे. रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला,ज्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. यादरम्यान एका मुलाखतीत क्रितीनं आपल्या मॉडेलिंगच्या दिवसांना आठवत काही आठवणी ताज्या केल्या आहेत.

हार्पर बाजार इंडियाला दिलेल्या मुलाखतीत क्रितीनं सांगितलं की तिच्या पहिल्या फोटोशूट दरम्यान ती खूप नर्व्हस होती. याच मुलाखतीत ती आपल्या आईविषयी देखील बोलली. तिनं सांगितलं की तिची आई प्रोफेसर होती आणि आपल्या प्रेग्नेंसीच्या काळात त्यांनी पीचडी पूर्ण केल्याचं देखील क्रितीनं सांगितलं. (Adipurush Actress Kriti Sanon crying after first photoshoot)

क्रिती सननने आपल्या कारकिर्दीतला पहिल्या फोटोशूटचा किस्सा आठवत सांगितलं की,''मी माझ्या पहिल्या फोटोशूट दरम्यान खूप नर्व्हस होती. मी काही चूका त्यावेळी केल्या होत्या. जेव्हा मी घरी आले तेव्हा मी खूप रडायला लागले कारण मी चांगलं काम केलं नाही,चुका केल्या ही गोष्ट मला टोचत होती''.

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा क्रिती सननने सिनेमात पदार्पण केलं नव्हतं. क्रितीनं महेश बाबूच्या '1: नेनोक्काडिन' या तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

क्रिती सनन या मुलाखतीत म्हणाली की,''आत्मविश्वास हा आपल्याला कामातून मिळतो आणि त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. मला वाटतं अपयशामुळेच आपण यशाची गोड फळं चाखतो''.

क्रिती सनन म्हणाली की, ''माझा आयुष्याचा मंत्रच असा आहे की आपल्याच चुकांमधून शिका आणि पुढे जा''.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. क्रिती सनन या सिनेमात सीतेच्या भूमिकेत आहे तर प्रभास प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. सिनेमातील क्रितीनं साकारलेल्या सीतेच्या लूकला खूप पसंत केलं गेलं आहे. हा सिनेमा १६ जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

Marathi Live Updates : मुंबईत गेल्या २४ तासांत विक्रमी मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसही जोर कायम

Beed: 'तुकाराम मुंढे पॅटर्न'ची बीडमध्ये एन्ट्री?; एफडीएच्या धडक कारवाईने व्यापाऱ्यांची पळापळ, परवान्यासाठी महिनाभरात 2,241 अर्ज

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प, ३ फूटापर्यंत पाणी; नागोठणेपासून पर्यायी मार्गाने वाहतूक

SCROLL FOR NEXT