Adipurush Movie Controversy Google
मनोरंजन

Adipurush: प्रभासचा 'आदिपुरुष' पुन्हा पोहोचला कोर्टात..प्रमाणपत्राविनाच टीझर रिलीज केल्याचा होतोय आरोप

'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाला तेव्हा सिनेमातील सैफनं साकारेल्या रावणाच्या लूकवरनं देशभरात वाद पेटला होता.

प्रणाली मोरे

Adipurush: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला' आदिपुरुष' सिनेमावरुन निर्माण झालेला वाद दिवसागणिक वाढत चालला आहे.

या चित्रपटातील प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या लूकवरून प्रचंड चर्चा आणि वाद झाला होता होता.

पुन्हा एकदा हा चित्रपट वेगळ्याच कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.(Adipurush Allahbad high court asks board to file reply on plea against om raut prabhas)

झालं असं की,या चित्रपटाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न घेता चित्रपटाचा टीझर रिलीज केल्याचा दावा करण्यात आला होता. आता या प्रकरणी न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाकडून उत्तर मागितले आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली.अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाकडे उत्तर मागितले आहे.

या याचिकेत असे म्हटले आहे की, चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न घेता आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. असे प्रोमो रिलीज करणे नियमांच्या विरोधात असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. चित्रपटात देवी सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेननने परिधान केलेल्या कपड्यांच्या डिझाईनवरही याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.

शिवाय या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या भूमिकेबद्दल वाद झाले आहेत. लोकांची प्रभू राम आणि देवी सीता यांच्यावर नितांत श्रद्धा आहे, मात्र चित्रपटात ते लोकांच्या श्रद्धेच्या विरोधात दाखवण्यात आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

याचिकेत रावणाच्या लूक बाबतही आक्षेप घेण्यात आला आहे. प्रभू राम, माता सीता आणि रावणाच्या भूमिका साकारणारे अभिनेते प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, तसेच हनुमानाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सनी सिंग, चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक ओम राऊत एकंदरीत या सर्वांवरच याचिकेत आरोप करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT