Adipurush box office collection drop on 6th day bollywood news SAKAL
मनोरंजन

Adipurush 6th day box office: कमाईची गाडी घसरली.. आदिपुरुषची सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमार कामगिरी

आदिपुरुषचा सहाव्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट पाहता सिनेमा थिएटरमधून गाशा गुंडाळणार असं दिसतंय

Devendra Jadhav

Adipurush 6th day box office: आदिपुरुष सिनेमाला सध्या सर्वजण टार्गेट करत आहेत. आदिपुरुष सिनेमा प्रेक्षकांच्या टीकेचा धनी बनला आहे. आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. आदिपुरुषचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय.

आदिपुरुष सिनेमा रिलिज होऊन आता ६ दिवस झाले आहेत. आदिपुरुषचा सहाव्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट पाहता सिनेमा थिएटरमधून गाशा गुंडाळणार असं दिसतंय.

(Adipurush box office collection drop on 6th day bollywood news)

आदिपुरुषचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट:

'आदिपुरुष'ने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.7 कोटी (हिंदी 5.5 कोटी, तेलुगू 4.7 कोटी) कमावले असताना, सहाव्या दिवशी ही कमाई 7.50 कोटींवर आली आहे.

चित्रपटाच्या कमाईचा हा आकडा निर्मात्यांना नक्कीच मनस्ताप देणारा ठरू शकतो. एकूणच या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर 255.30 कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास 500 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, या चित्रपटाने पाच दिवसांत जगभरात 395 कोटींची कमाई केली आहे.

Sacnilk अहवालानुसार, चित्रपटाचा हिंदी चित्रपटगृहांमध्ये सहाव्या दिवशी 9.44%, सकाळच्या शोमध्ये 7.10%, दुपारच्या शोमध्ये 9.47%, संध्याकाळच्या शोमध्ये 10.62% आणि रात्रीच्या शोमध्ये 10.56% इतका व्यवसाय आहे.

एकूणच थिएटरमध्ये हळूहळू आदिपुरुष पाहणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे हा सिनेमा पुढच्या काही दिवसात थिएटरमधून जाईल, अशी शक्यता आहे.

१६ जून रोजी आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट सातत्यानं सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

त्यातील कथा, भूमिका करणारे कलाकार, दिग्दर्शन, संवाद या साऱ्या गोष्टी वादाचे कारण ठरताना दिसत आहे.

यामुळे अनेकांनी त्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काही हिंदूत्ववादी संघटना, राजकीय पक्ष यांनी देखील आदिपुरुषबाबत तिखट प्रतिक्रिया देत या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी.असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT