Asit Modi FIR: सर्वांसमोर माझी माफी मागा नाहीतर... जेनिफर आणि असित मोदींमधला वाद टोकाला

अशातच मालिकेतील रोशन भाभी फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्री आणि निर्माते असित मोदी यांचा वाद चिघळला आहे
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah jenifer mistry and asit modi conflict update
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah jenifer mistry and asit modi conflict updateSAKAL

Jenifer Mistry and Asit Modi Conflict News: तारक मेहता का उलटा चष्मा मालिका सध्या विविध वादांमुळे चर्चेत आहे. मालिकेतले अनेक कलाकार आणि विशेषतः महिला कलाकार मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत.

अशातच मालिकेतील रोशन भाभी फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्री आणि निर्माते असित मोदी यांचा वाद चिघळला आहे. मोदींनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी जेनिफरने केलीय.

(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah jenifer mistry and asit modi conflict update)

जेनिफर म्हणाली, 'त्याने माझ्यावर अनेक गंभीर आणि खोटे आरोप केले आहेत. एवढंच जर माझ्याशी वाकडं होतं तर मला इतके दिवस सहन का केलं.

दिलकुश गेल्यानंतर मला शोमध्ये परत का आणले? मला त्यांच्याकडून जाहीर माफी हवी आहे, असे मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे. असं जेनिफर म्हणाली

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah jenifer mistry and asit modi conflict update
Choi Sung Bong Death: राहत्या घरी आत्महत्या, दक्षिण कोरियाचा गायक चोई सुंग बोंगचे निधन

जेनिफरने यापूर्वी ETimes ला सांगितले होते की, असित मोदींची जाहीर माफी मागावी. त्यासाठी तिने वकिलाची मदत घेतली असती.

8 मार्च रोजी तिने असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज अशा तिघांनाही नोटीस पाठवली असती.

एवढेच नाही तर जेनिफर मिस्त्रीने सर्व सरकारी अधिकाऱ्यांना मेल करून रजिस्ट्री पाठवली. पण अजून कोणाकडून काही रिप्लाय आला नाही.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah jenifer mistry and asit modi conflict update
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने घेतला फर्मास उखाणा

दरम्यान मुंबई पोलिसांनी तारक मेहता का उल्टा चष्माचा निर्माता असित मोदी आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरुद्ध शोच्या एका अभिनेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पवई पोलिसांनी असित कुमार मोदी विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 आणि 509 (महिलेवर हल्ला करणे किंवा तिच्या विनयभंगाच्या उद्देशाने बळजबरी करणे) अंतर्गत FIR नोंदविला आहे.

मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. आता जेनिफरने आरोप केल्याने निर्माते असित मोदी आणि तिच्यातला वादाला कोणते नवीन वळण येणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com