Adipurush Teaser esakal
मनोरंजन

Adipurush Teaser: 'असा कुठं हनुमान असतो का?' निर्मात्यांना BJP च्या गृहमंत्र्यांची 'तंबी'

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे आदिपुरुषच्या निर्मात्यांवर चांगलेच भडकले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Teaser: मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे आदिपुरुषच्या निर्मात्यांवर चांगलेच भडकले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आदिपुरुषच्या टीझरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र ज्याप्रकारे ऐतिहासिक पात्रांची मांडणी केली आहे ती अनेकांना खटकली आहे. त्यावर आता मिश्रा यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजीही व्यक्त केली आहे. हनुमानजी यांचे वस्त्र हे चामड्याचे दाखवण्यात आले आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कुठल्याही प्रकारे तार्किक विचार न करता लोकप्रियतेच्या हव्यासापोटी इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. त्यावरुन भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा गांभीर्यानं विचार निर्मात्यांनी करणं गरजेचं आहे. अशी प्रतिक्रिया मिश्रा यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु केली होती. काहींनी हा तर सगळा पोरखेळ असल्याचे म्हटले आहे. सैफ अली खान, प्रभास यांना ट्रोल करण्यात आले होते.

लहान मुलांसाठी असणाऱ्या व्हिडिओ गेम्ससारखा टीझर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट कसा असेल याची कल्पना आली आहे. यासगळ्यात आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असे नेटकऱ्यांनी म्हटले होते. हिंदू महासभेने देखील रावणच्या लूकवर नाराजी व्यक्त केली होती. महासभेचे अध्यक्ष चक्रपाणी महाराज म्हणाले होते की, भगवान शिवाचे भक्त असणाऱ्या रावणाचे ज्याप्रकारे चित्रिकरण करण्यात आले ते खूपच दुखावणारे आहे.

खूपच विनोदी पद्धतीनं त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. लंकापतीची भूमिका सैफ अली खाननं केली आहे. त्यानं अशाप्रकारे भूमिका केली आहे की, तो आतंकी खिल्जी किंवा चंगेज खान आहे. अशा भूमिकांना प्रोत्साहन देणारं चित्रिकरण आदिपुरुषच्या निमित्तानं समोर आलं आहे. आपल्या कथांची तोडमोड करणारं काही नको. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. बीजेपीचे प्रवक्ते मालविक यांनी देखील फिल्म निर्माता ओम राऊतवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या भावनांची काळजी आहे की नाही, रामायणावर आधारित आदिपुरुषमध्ये सगळं काही वेगळ्या पद्धतीनं सादरीकरण करण्यात आले आहे. ज्याप्रकारे ते समोर आले आहे त्यावरुन भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT