'Adipurush' Director Om Raut react on criticism of film teaser
'Adipurush' Director Om Raut react on criticism of film teaser Instagram
मनोरंजन

Adipurush: 'मला माहीत होतं सिनेमाला ट्रोल केलं जाणार कारण..',दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला

प्रणाली मोरे

Adipurush: काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष सिनेमाचा टीझर रिलीज झाला. या सिनेमात साऊथ सुपरस्टार प्रभास राघव, कृती सनन जानकी तर सैफनं लंकेश ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सिनेमा रामायणाच्या कथानकावर आधारित आहे. पण सिनेमाचा टीझर रिलीज झाला अन् सैफ अली खानच्या लूकवरनं तसंच सिनेमातील व्हीएफएक्स वरनं सोशल मीडियावर जोरदार सिनेमावर ट्रोलिंगचा मारा केला जात आहे. आता आपल्या सिनेमाची बाजू घेत दिग्दर्शक ओम राऊतची प्रतिक्रिया समोर येत आहे. ('Adipurush' Director Om Raut react on criticism of film teaser)

सोशल मीडियावर आदिपुरुष संदर्भात खूप उलट-सुलट बोललं जात आहे,लोकांना सिनेमाचा टीझर आवडला नसल्याचं समोर आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक ओम राऊत म्हणाला आहे की,''सिनेमावर ज्या पद्धतीनं मीम्स केले जात आहेत ते पाहून खूप वाईट वाटलं. मला ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया सिनेमाचा टीझर पाहिल्यावर मिळत आहेत ते पाहून फार आश्चर्य वाटलं नाही कारण मला तसं काहतरी घडेल असा अंदाज होताच आधीपासून. ओमनं असं देखील म्हटलं की जेव्हा सिनेमाघरात लोक सिनेमा पाहतील तेव्हा कदाचित याच व्हीएफक्स प्रती त्यांची प्रतिक्रिया वेगळी असेल''.

ओम राऊतनं याआधी सुपरहिट 'तानाजी-द अनसंग वॉरियर' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तानाजी सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला आणि तानाजी मध्ये देखील व्हीएफक्सचा वापर करण्यात आला होता. सिनेमाच्या टीझरच्या ३ डी स्क्रीनिंग दरम्यान ओम राऊत म्हणाला, ''मला आदिपुरुष संदर्भात जे बोललं जात आहे ते ऐकून वाईट वाटलं. पण हा सिनेमा मोठ्या पडद्यासाठी बनलेला आहे आणि छोट्या पडद्यावर याचा अंदाज येणं अशक्य आहे. मी आता परिस्थितीला कंट्रोल नाही करू शकत. मला खरं तर सांगितलं गेलं होतं की मी सिनेमाचा टीझर युट्युब वर रिलीज करु नये पण तरीदेखील वेळेच्या गरजेनुसार मला तो युट्युबवर रिलीज करण्याचा निर्णय घ्यावा लागला. जास्तीत जास्त लोकांनी सिनेमाचा टीझर पहावा म्हणून केवळ तो युट्युबवर रिलीज करण्यात आला''.

पुढे थोडं आणखी स्पष्टिकरण देत दिग्दर्शक ओम राऊत म्हणाला,''माझे पार्टनर असलेल्या टी-सीरिजच्या युट्युब चॅनलचे जगभरात सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. आणि प्रेक्षक सिनेमागृहात तेव्हाच सिनेमा पहायला येतात जेव्हा सिनेमाचं प्रमोशन त्यांच्यापर्यंत पोहोचतं. लोकांनी रामायण खरंतर याआधी पाहिलं आहे. आणि आम्हाला वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांची गरज आहे. मला टीझरवर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत याचं मुळीच आश्चर्य वाटत नाही कारण लोकांनी छोट्या पडद्यावर हे आतापर्यंत पाहिलं आहे''.

'आदिपुरुष' सिनेमा १२ जानेवारी,२०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाला वेगवेगळ्या भाषांमध्ये आयमॅक्स आणि थ्री डी व्हर्जनमध्ये रिलीज केलं जाईल. हिंदी भाषेव्यतिरिक्त सिनेमा तेलुगु,तामिळ,मल्याळम,कन्नड भाषांमध्ये रिलीज केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT