Adipurush Movie News Adipurush Movie News
मनोरंजन

Adipurush : आदिपुरुष फ्लॉप होण्याची शक्यता अधिक? टीझर पाहताच ५ कारणे आली समोर

लोक प्रभासच्या चित्रपटातील राम लूकवर फारसे समाधानी नाही

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Movie News सैफ अली खान आणि प्रभास स्टारर आदिपुरुष चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा रंगली होती. प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, टीझर रिलीज झाल्यानंतर बहुतांश चाहत्यांची निराशा झाली. आदिपुरुष चित्रपटाचे बजेट ५०० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. जे ब्रह्मास्त्रच्या बजेटपेक्षा १०० कोटी जास्त आहे. असे असूनही चित्रपट फ्लॉप होण्याचे भरपूर वाव आहे.

आदिपुरुष फ्लॉप ठरण्याची दाट शक्यता आहे. याचे पहिले कारण म्हणजे चित्रपटाचे व्हीएफएक्स काम. निर्मात्यांनी याला व्हीएफएक्स चित्रपट म्हटले होते. परंतु, चित्रपटाचे व्हीएफएक्स इतके खराब आहे की व्हीएफएक्स ऐवजी कार्टून किंवा ॲनिमेशन चित्रपट म्हणत ट्रोल केले जात आहे. व्हीएफएक्सच्या बाबतीत ब्रह्मास्त्रने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

सोशल मीडियावर कलाकारांना जुन्या विधानांमुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. आदिपुरुषच्या रिलीजपूर्वी सैफ अली खानचे असेच वक्तव्य समोर आले आहे. सैफ अली खानचे विधान सोशल मीडियावर सतत शेअर केले जात आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, तो आपल्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही.

सोशल मीडियावर लोक प्रभासच्या चित्रपटातील राम लूकवर फारसे समाधानी नाही. त्याचे शेवटचे दोन बिग बजेट चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाले. रामच्या पात्राला मिशा असल्याबद्दलही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

एका चित्रपटाची दुसऱ्या चित्रपटाशी तुलना करणे योग्य नसले तरी हिंदी चित्रपटसृष्टीत हे अगदी सामान्य आहे. आदिपुरुष रिलीज होताच लोक या चित्रपटाची तुलना ब्रह्मास्त्रशी करू लागले आहेत. दोन्ही चित्रपटांची कथा आणि संदर्भ जरी वेगवेगळे असले तरी तरीही प्रेक्षक दोन्ही चित्रपटाची तुलना करीत आहेत.

आदिपुरुषमधील सैफ अली खानचा लूकही वादाचे कारण बनला आहे. एकीकडे रामाचे पात्र मिशी असलेले दाखवले आहे तर रावणाचे पात्र लांब दाढीचे आहे. सैफ अली खानच्या रावण लूकची लोक अलाउद्दीन खिलजीसोबत तुलना करीत आहेत. रावणाने इस्लाम स्वीकारला का, असे प्रश्न विचारले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT