Adipurush Reactions Video: Esakal
मनोरंजन

Adipurush Reactions Video: हनुमानासाठी ठेवण्यात आलेल्या 'त्या' सीटच केलं तरी काय? व्हिडिओ व्हायरल..

Vaishali Patil

Adipurush Reactions Video: आदिपुरुष हा बहूप्रतिक्षीत सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची उत्सुकता देशभरात नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणावर होती. चित्रपटाची क्रेझ पाहता हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडणार अशी आशाही व्यक्त केली जात आहे.

रामायणावर आधारित या चित्रपटाबद्दल खुपच आकर्षण होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

आदिपुरुष चित्रपटाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी निर्मात्यांनी कसलिच कसर सोडली नाही. निर्मात्यांनी रिलीजपूर्वी जाहीर केले होते की प्रत्येक चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक खूर्ची रिकामी ठेवली जाईल.

आता चित्रपटगृहांमधून भगवान हनुमानासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव जागेची अनेक छायाचित्रे समोर येत आहेत.

त्यातच एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला ज्यात एक माकडही थिएटरमध्ये पोहोचले होते. आता त्यातच आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याव्हिडिओत फोटो दिसत आहेत.

या फोटोला फुलांचा हार घालण्यात आला आहे. या फोटोनंतर आणखी काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले ज्यात असेच चित्र दिसत आहे.

पहिल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थिएटरच्या समोरच्या सीटवर हनुमानचा फोटो लावून पूजा करत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आर्य विद्या मंदिर शाळेचे शिक्षक तेथील मुलांसोबत थिएटरमध्ये पूजा करत आहेत. स्क्रिनिंग सुरू होण्यापूर्वी त्यांनी पुजा केली आहे.

आदिपुरुषच्या निर्मात्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील चाहते देखील आश्चर्यचकित झाले. थिएटरमधून घेतलेल्या या व्हिडिओमध्ये प्रभासला पडद्यावर भगवान रामाच्या रूपात पाहिल्यानंतर चाहते जय श्री राम म्हणत आहेत आणि खुप उत्तेजित झाले आहे.

त्याचबरोबर प्रेक्षकांनी चित्रपटाचा रिव्हू देखील सोशल मिडियावर शेयर करत त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रेक्षकांना आदिपुरुष खुप आवडला आहे. प्रभासने रामाचे पात्र अतिशय उत्तमरित्या केल आहे तर जानकीच्या भुमिकेत क्रिती आणि रावणाच्या भुमिकेत सैफ अली खानही प्रेक्षकांना भावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT