kriti sanon  Sakal
मनोरंजन

Kriti Sanon: 'मी प्रेमात...', क्रिती सेनॉन हिने केला तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा

क्रिती सेनॉन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. लव्ह लाईफमुळे यावेळी तिने मोठा खुलासा केला, ज्यामुळे क्रिती सेनॉन ही चर्चेत आलीये.

सकाळ डिजिटल टीम

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर क्रिती सेनॉनचे नाव त्यात नक्कीच सामील होईल. क्रिती सेनॉन तिच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तिच्या चित्रपटांसोबतच, क्रिती तिच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे.

दरम्यान, क्रितीने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. प्रेमात ती आंधळी होऊन जाते असे क्रितीने सांगितले आहे. याशिवाय क्रितीनेही तिच्या भूतकाळाबद्दल खुलासा केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत क्रितीला तिच्या लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याला क्रितीने खुलेपणाने उत्तर दिले आहे. क्रिती म्हणाली आहे की- 'असे होऊ शकते की मी खूप व्यस्त आहे आणि म्हणूनच कदाचित माझ्या आयुष्यात कोणी नाही, मी अद्याप कोणालाही भेटले नाही.

आता जरी माझ्या आयुष्यात कोणी नसले तरीही असे नाही की, अगोदर कोणी नव्हते. कदाचित आता खूप काम करण्याची वेळ आहे आणि माझ्या भोवती मला हवी तशी योग्य व्यक्ती नसावी. क्रिती म्हणाली, मला वाटते की, प्रेमामध्ये मी बऱ्याच वेळा खूप जास्त आंधळी होते'.

याशिवाय क्रितीने भूतकाळातील रिलेशनशिपबद्दलही सांगितले आहे की- 'मला वाटते की मी प्रेमात थोडी आंधळी होते . मी समोरच्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवायला लागते.मात्र, आता मी थोडी सर्तक झालीये.

मी अगोदर समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेईल मग हळूहळू त्याच्यावर विश्वास करेल. माझ्या मते, कोणतेही नाते विश्वासाशिवाय चालत नाही आणि कोणीतरी म्हटले आहे की प्रेम आंधळे असते.

याआधी क्रितीचे नाव साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभासला डेट करण्यासाठी चर्चेत आले आहे. मात्र, क्रितीने प्रभाससोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय या दोन्ही स्टार्सकडून रिलेशनशिपबद्दल कधीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. क्रिती सेनॉन आगामी काळात 'आदिपुरुष' आणि 'गणपत' या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT