adipurush sunny singh who played laxman criticised by ramayan serial star sunil lahri who played laxman SAKAL
मनोरंजन

Adipurush मधला लक्ष्मण म्हणजे... रामायण मालिकेतील लक्ष्मण साकारलेल्या अभिनेत्याची रोखठोक प्रतिक्रिया

सनी सिंगच्या लक्ष्मणाच्या भूमिकेवर रामायण मालिकेत ज्यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारली होती अशा सुनील लहरी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिलीय.

Devendra Jadhav

Adipurush Movie News: ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. आदिपुरुष सिनेमा आता काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास तर हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे झळकत आहे.

तर लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकत आहे अभिनेता सनी सिंग. सनी सिंगच्या लक्ष्मणाच्या भूमिकेवर रामायण मालिकेत ज्यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारली होती अशा सुनील लहरी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिलीय.

(adipurush sunny singh who played laxman criticised by ramayan serial star sunil lahri who played laxman)

ओम राऊतच्या चित्रपटाबाबत सुनील लाहिरी यांनी एका मुलाखतीत लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सनी कौशलबद्दल सांगितले आहे.

सुनील लाहिरी म्हणाले, "आत्तापर्यंत काहीही सांगणे फार कठीण आहे कारण ट्रेलरमध्ये लक्ष्मणच्या व्यक्तिरेखेबद्दल काहीच दिसत नाही, परंतु मला खात्री आहे की सनी एक उत्तम अभिनेता आहे आणि त्याने भूमिकेला न्याय दिला असेलच."

सुनील पुढे म्हणतात, "लक्ष्मणच्या भूमिकेत करण्यासारखे बरेच काही आहे पण दिग्दर्शक, लेखक ही व्यक्तिरेखा कशी मांडू इच्छितात यावर ते अवलंबून आहे."

रामायणच्या शूटिंगचे दिवस आठवून सुनील म्हणतात, "जेव्हा मी रामायणचे शूटिंग करत होतो, तेव्हा माझ्याकडे लक्ष्मणच्या पात्रासाठी भूतकाळात कोणताही संदर्भ नव्हता.

ज्याचा मला आधार मिळू शकेल. मी जे काही करू शकलो ते रामानंद सागर साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच. मी आदिपुरुष तसेच सनी सिंग आणि बाकी कलाकारांना खूप खूप शुभेच्छा."

टी-सीरीज निर्मित, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होणार होता. पण लोकांनी चित्रपटाच्या ग्राफिक्सची इतकी खिल्ली उडवली की निर्मात्यांनी एडिट टेबलवर सिनेमाला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला. \

आता आदिपुरुष हा सिनेमा 16 जूनला हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेकांना या सिनेमाची उत्सुकता असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : दुपारी उन्हाचा चटका तर रात्री गारठा ! राज्यात पुढील ४ दिवसांत थंडीचा जोर वाढणार, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ११ नोव्हेंबर २०२६

Aryavir Sehwag Century: १७ चौकार अन् ७ षटकार... ज्युनियर सेहवागची दीडशतकी खेळी अन् शुभमन गिलच्या विक्रमाची केली बरोबरी

Viral Video : लेकीची दिवाळी साजरी करण्यासाठी आईने शेळी विकली...भावनिक व्हिडिओ व्हायरल

पुढच्या पाच दिवसांत ५ राशींचं नशीब चमकणार! वक्री शुक्र देणार भरभरून लाभ, उत्पन्नाचे नवे मार्गही खुलणार

SCROLL FOR NEXT