Adipurush movie teaser  esakal
मनोरंजन

Adipurush Controversy: 'चूकीला माफी नाही', युपीचे उपमुख्यमंत्री भडकले!

ओम राऊत यांचे दिग्दर्शन असलेल्या आदिपुरुषमधील ग्राफीक्स पाहून अनेकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Teaser Controversy: बॉलीवूडमधील बहुचर्चित असा आदिपुरुष आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता फक्त त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे त्यावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अजुन तर ट्रेलर आणि मग चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच नेटकऱ्यांनी या चित्रपटावर केलेली टीका अनेकांच्या चर्चेचा विषय ठरते आहे. काही झालं तरी हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे.

ओम राऊत यांचे दिग्दर्शन असलेल्या आदिपुरुषमधील ग्राफीक्स पाहून अनेकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. आता यामध्ये युपीच्या उपमुख्यमंत्र्यांनी तर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आदिपुरुषचा प्रवास हा काही सोपा असणार नाही हे दिसून आले आहे. यापूर्वी हिंदू महासभेनं देखील या चित्रपटामध्ये हिंदूच्या भावना दुखावल्याचे आणि त्यातील व्यक्तिरेखांविषयी टिप्पणी केली होती.

भाजपच्या पदाधिकारी महापात्रा यांनी देखील रावण या व्यक्तिरेखेवरुन नाराजी व्यक्त केली होती. रावणाच्या कपाळाला गंध नाही. आपलं श्रद्धास्थान असणाऱ्या व्यक्तिरेखांविषयीच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी सांगितले होते. आता युपीच्या उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामध्ये त्यांनी आदिपुरुषवर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला आहे.

पाठक म्हणाले, हिंदूच्या भावनांना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते आम्ही सहन करणार नाही. आदिपुरुषमध्ये व्यक्तिरेखांशी खेळण्याचा आणि त्यांची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे असेच राहिल्यास हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका पाठक यांनी घेतली आहे. यापूर्वी राऊत यांच्या आदिपुरुषवरुन अनेक सेलिब्रेटींनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land deal: मुंढवा जमीन गैर व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लिन चीट, दोषी कोण? अहवालात काय म्हटलं?

नेवासे तालुका हादरला! 'सदस्यांच्या छळाला कंटाळून पदाधिकाऱ्याने जीवन संपवले'; शिक्षण संस्थेच्या सहा सदस्यांवर गुन्हा, चिठ्ठीत काय दडलयं?

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT