Adipurush writer Manoj Muntashir defends Hanuman’s dialogues  sakal
मनोरंजन

Adipurush: मुद्दामच तसं लिहिलं.. हनुमानाच्या वादग्रस्त डायलॉगवर लेखकाची सारवासारव..

'आदिपुरुष' मधील हनुमानाच्या संवादावरून आता चांगलाच वाद पेटला आहे.

नीलेश अडसूळ

Manoj Muntashir on hanuman dialouge: सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट अखेर काल १६ जून रोजी रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट टीजर रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

त्यानंतर मध्यंतरी ट्रेलर पाहून परिस्थिती जरा सुधारली आणि लोकांमध्ये पुन्हा आदिपुरुषची क्रेझ निर्माण झाली. पण चित्रपट प्रदर्शित होताच पुन्हा एकदा प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे.

कालपासून या चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे. चित्रपटातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार सगळ्यावरच लोक सडकून टीका करत आहे. त्यात हनुमानाचे संवादही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

हनुमनाच्या तोंडी असे छपरी डायलॉग का घातले म्हणून प्रेक्षकांनी निर्मात्यांना चांगलेच धारेवर धरले आहेत. आता या प्रकरणावर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

( Adipurush writer Manoj Muntashir defends Hanuman’s dialogues)

'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की' असा संवाद हनुमानाच्या तोंडी आहे. या संवादामुळे आता मोठा वाद पेटला आहे. पण आता चित्रपटाचे संवाद लेखक यांनी या प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत मनोज मुंतशीर म्हणाले, 'आताच्या पिढीला संवाद कनेक्ट व्हावे, त्यामुळे तशा भाषेत डायलॉग लिहिले आहेत. फक्त हनुमानाबद्दलच का बोललं जात आहे? श्रीरामांच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेचे संवाद जिथे ती आव्हान देते त्याबद्दल बोलले पाहिजे,” असं ते म्हणाले.


हे संवाद जाणीवपूर्वक लिहिले का? या प्रश्नावरही त्यांनी दुजोरा दिलं. ते म्हणाले, 'होय.. निश्चितच हे संवाद जाणीवपूर्वक लिहिले आहेत. आणि ते पूर्ण विचार करून लिहिले. संवाद सर्वांना कळावे म्हणून ते सोपे ठेवले आहेत. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की चित्रपटात अनेक पात्रे असतील तर प्रत्येकाला एकच भाषा बोलता येत नाही. त्यामध्ये वेगळेपणा असला पाहिजे,'


पुढे ते म्हणाले की, 'आम्ही लहानपणापासून रामायणाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. मी एका छोट्या गावातून आलोय, तिथे माझी आजी जेव्हा गोष्टी सांगायची तेव्हा ती याच भाषेत सांगायची. या देशातील महान संत, महान कथाकार हे देखील याच भाषेत बोलतात. असे संवाद लिहिणारा मी पहिला नाही, हे पूर्वीपासून चालत आलं आहे. अशा शब्दात त्यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT