Aditi Rao Hydari And Siddharth Relationship Esakal
मनोरंजन

Aditi-Siddharth Relationship:आदिती आता होणार सिद्धार्थ 'रावां' ची, लवकरच अडकणारच लग्न बंधनात

अदिती साऊथ अभिनेता सिद्धार्थला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या.

Vaishali Patil

Aditi Rao Hydari Relationship: सध्या सर्वच कलाकार आपल्या नव वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर शेयर करत आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यात आलिया, कियारा, करिना अशा बऱ्याच सेलिब्रिटींचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

यातच आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या वेळी तिच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ती अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी.

'रॉकस्टार', 'मर्डर 3', 'फितूर' आणि 'पद्मावत' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आदितीची काही वेगळी ओळख देण्याची गरज नाही. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र आता अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अदिती साऊथ अभिनेता सिद्धार्थला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. अनेकदा दोघांना सोबत पाहिलं गेलं होतं. मात्र या दोघांनी कधीही त्याच्या नात्याचा खुलासा केला नव्हता. आता त्यातच आदितीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्यावर मोहर लावली आहे.

आदितीने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत दिसत आहे. आदितीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आनंदी, धन्य आणि कृतज्ञ. जादुई आनंदाबद्दल धन्यवाद. एकमेकांवर प्रेम करा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा."

सध्या आदिती आणि सिद्धार्थचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे चाहते त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत दोघांचे कौतुक करत आहेत. सध्या सिद्धार्थ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

कोण आहे सिद्धार्थ?

सिद्धार्थचे नाव सिद्धार्थ सूर्यनारायण आहे. तो साउथ अभिनेता आहे. त्यांने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तो अभिनेत्यासोबतच निर्माता आणि गायक देखील आहे. 2002 मध्ये आलेल्या 'कन्नाथिल मुथामित्तल' या चित्रपटातून त्यांने आपल्या करिअरला सुरुवात केली. 2006 मध्ये त्याने बॉलीवूड चित्रपट 'रंग दे बसंती' चित्रपटात काम केले होते. तर त्याने आदितीसोबत 'महा समुद्रम' या चित्रपटात एकत्र काम केले होते.

सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी या दोघांचे पहिले लग्न झाले आहे. मात्र दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. अदिती 2009 मध्ये गुपचूप लग्न केलं. मात्र, अवघ्या चार वर्षांनी म्हणजेच 2013 मध्ये या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी घटस्फोट घेतला. तर सिद्धार्थने 2003 मध्ये पहिले लग्न केले होते. तर 2007 मध्ये त्याचा घटस्फोट झाला.

आता सिद्धार्थ आणि आदिती लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा आहे. दोघांचे चाहते या गोड बातमीची उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

Viral Video Mother Dolphin : मन हेलावणारी घटना! मृत डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Lucky Rashifal 2026: कन्या राशीसह 'या'3 राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल नवे वर्ष, सर्व इच्छा पूर्ण होतील

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

SCROLL FOR NEXT