Aditya Narayan Accidentally Tore His Pyjama During His Wedding 
मनोरंजन

'नवरीला हार घालायला गेला तेवढ्यात पायजमा फाटला'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कधी, कुठे आणि कशी फजिती होईल हे सांगता येत नाही. अशीच एक वेगळीच फजिती एका बड्या गायकाच्या मुलाच्या लग्नात झाली. सगळे लोक जमले होते, मंगलाष्टके झाली नवरदेवाला त्याच्या मित्रांनी उचलून घेतले. नवरीला हार घालण्यासाठी त्याला थोडं धडपडावे लागले. याचे कारण म्हणजे मित्र करीत असलेल्या खोड्या. मात्र नवरीला हार घालताना आपला पायजमा फाटला आहे हे ज्यावेळी नवरदेवा सकट इतरांना कळलं तेव्हा मंडपात हशा झाला.

हे सगळं घडलं ते बॉलीवूडचे प्रसिध्द गायक उदित नारायण यांच्या मुलाच्या म्हणजे आदित्य नारायणच्या लग्नात. नुकतचं त्याचं मोठ्या उत्साहानं, थाटामाटात लग्नं पार पडलं. ते होत असताना नवरीला हार घालण्याची वेळ आली त्यावेळी आदित्यला फजितीला सामोरं जावं लागलं आहे. याविषयी त्यानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, मंडपात जो प्रकार घडला तो प्रसंग कायम माझ्या आठवणीत राहिल.

लग्नातल्या काही गोड आणि संस्मरणीय आठवणी असतात. असाच तो प्रकार होता. लग्नाच्यावेळी श्वेताला वरमाला घालत असताना माझ्या भावांनी मला उचललं. त्यानंतर माझ्या मित्रांनीदेखील मला उचललं. पण त्याचवेळी माझा पायजमा फाटला. खरं तर तो क्षण अत्यंत लाजिरवाणा होता. त्यामुळे मला थोडं ओशाळल्यासारखं झालं होतं. 

आदित्य नारायण सध्या सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय आहे.  श्वेता ही अभिनेत्री आहे. तिने शापित या चित्रपटातून 2010  मध्ये बॉलीवूडमध्ये इंट्री केली. 10  ते एकमेकांना डेट करत होते. त्यांचा विवाह जुहूमधील इस्कॉन टेम्पल येथे पार पडला. उदित नारायण यांनी या लग्नाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रेटींना दिलं होतं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

SCROLL FOR NEXT