AADITYA NARAYAN
AADITYA NARAYAN 
मनोरंजन

नेहा कक्करनंतर आदित्य नारायण झाला लग्नासाठी तयार, 'या' अभिनेत्रीसोबत घेणार सात फेरे

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालाय. आदित्य त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लवकरंच लग्न करणार आहे. १० वर्ष हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र गेल्या १० वर्षात त्यांच्या नात्यामध्ये  अनेक चढ उतार आले मात्र दोघांनीही कधी सार्वजनिकरित्या यावर खुलेपणाने त्यांच्या नात्याची चर्चा केली नाही. आता दोघांच्या सहमतीने यांचं लग्न पार पडणार आहे.

आदित्यने सांगितलं की तो 'श्वेता अग्रवालसोबत २०१० मध्ये आलेल्या 'शापित' सिनेमाच्या सेटवर भेटला होता तेव्हापासूनंच दोघं एकमेकांना पसंत करायला लागले. आदित्यने सांगितलं होतं की सुरुवातीला श्वेता फक्त मैत्रीण बनू इच्छित होती कारण आम्हा दोघांनाही आमच्या करिअरवर फोकस करायचा होता. तेव्हा आमचं वय देखील जास्त नव्हतं. प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्या नात्यांमध्ये आम्ही अनेक चढउतार पाहिले. आता हा लग्न करण्याचा निर्णय केवळ एक औपचारिकता आहे. आशा आहे की नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आम्ही लग्न करु. माझ्या आई-वडिलांना श्वेता पसंत आहे आणि ते एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात.' 

काही दिवसांपूर्वी 'इंडियन आयडल'च्या सेटवर अनेकदा आदित्य आणि नेहाच्या लग्नाची चर्चा व्हायची. यावरही आदित्य म्हणाला की ती केवळ अफवा होती. ती एक थट्टा मस्करी होती. तेव्हा आम्हाला स्क्रीप्ट फॉलो करणं गरजेचं होतं. मात्र लोकांनी खूप लांब पर्यंत विचार केले. त्या गोष्टींमध्ये काहीही सत्यता नव्हती. आदित्य म्हणाला की तो नेहाचा होणारा नवरा रोहनप्रीत सिंहला देखील खूप चांगला ओळखतो. आणि दोघंही एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.   

aditya narayan reveal he will get married with shweta aggarwal soon  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT