Aditya Narayan  
मनोरंजन

"IPL बंद झाल्याचा राग इंडियन आयडॉलवर काढतायत"; ट्रोलिंगवर आदित्य नारायण व्यक्त

किशोर कुमार यांना समर्पित केलेल्या एपिसोडवरून सोशल मीडियावर होतेय टीका

स्वाती वेमूल

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'च्या Indian Idol 12 बाराव्या पर्वावर सध्या सोशल मीडियाद्वारे फार टिकाटिप्पणी होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये किशोर कुमार Kishore Kumar यांची गाणी स्पर्धकांकडून सादर करण्यात आली होती. मात्र त्यांच्या गाण्यांना परीक्षक आणि स्पर्धकांनी योग्य न्याय दिला नाही, असा आरोप करत नेटकऱ्यांनी शोबाबत नकारात्मक कमेंट्स पोस्ट करण्यास सुरुवात केली. या शोचा सूत्रसंचालक आणि गायक आदित्य नारायण Aditya Narayan आता या वादावर व्यक्त झाला आहे. आयपीएल IPL बंद झाल्यामुळे लोक त्याचा राग इंडियन आयडॉलवर काढत आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्यने दिली. (Aditya Narayan says people are upset at IPL ending venting anger at Indian Idol)

'बॉलिवूड स्पाय'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला, "दोन-तीन आठवड्यांपूर्वीच आयपील बंद झालं. त्याचा सर्व राग आमच्यावर काढत आहेत. आईवडिलांनी इंडियन आयडॉल पाहण्यासाठी रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात घेतला आहे, त्यामुळे तरुणवर्गाला राग अनावर होतोय. तो राग कुठे काढायचा हे त्यांना समजत नाहीये. गेल्या वर्षी आणि या वर्षीसुद्धा प्रेक्षकांकडे खूप वेळ आहे, म्हणून टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक कंटेटवर ते त्यांची मतं मांडत आहेत."

'इंडियन आयडॉल'वर फक्त प्रेक्षकच नाराज झाले नाही तर किशोर कुमार यांचा मुलगा आरजे अमित कुमार यांनीसुद्धा शोवर टीका केली. विशेष म्हणजे त्या एपिसोडमध्ये अमित कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. शोमधील स्पर्धकांची गाणी ऐकून त्यांची स्तुती करा, असं मला सांगण्यात आल्याचं त्यांनी नंतर एका मुलाखतीत बोलून दाखवलं.

अमित कुमार यांच्या प्रतिक्रियेवर आदित्य पुढे म्हणाला, "अमित कुमारजी या क्षेत्रात माझ्या वडिलांपेक्षाही मोठे आहेत. मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाहीये. त्यांनी याआधीसुद्धा दोन-तीन वेळा शोमध्ये हजेरी लावली होती. पण आता अचानक त्यांना काय झालं ते मला माहित नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT