aaditya udit narayan 
मनोरंजन

आदित्य नारायण त्याच्या लग्नात वडिलांच्या हिट गाण्यावर करणार डान्स, असं आहे पूर्ण प्लानिंग..

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड गायिका नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत यांच्या लग्नानंतर आता लवकरंच बॉलीवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा मुलगा आणि गायक-निवेदक आदित्य नारायण लग्नबंधात अडकणार आहे. आदित्य लवकरंच त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे. नुकतेच दोघांचे रोका समारंभाचे फोटो समोर आले होते. आदित्य सध्या सोशल मिडियापासून लांब राहतोय. मात्र नुकताच त्याने त्याच्या लग्नापासून ते हनीमून पर्यंतचा संपूर्ण प्लान शेअर केला आहे. 

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका मुलाखती दरम्यान आदित्यने सांगितलं की तो त्याच्या लग्नात वडिल उदित नारायण याचं हिट गाणं 'पहला नशा' वर डान्स करणार आहे. डान्ससाठी या गाण्याची निवड का केली असं विचारलं असता आदित्यने सांगितलं की त्याच्यासाठी देखील ही पहिल्याच नजरेची लव्हस्टोरी आहे.

आदित्यने सांगितलं की लग्नानंतर तो नवीन घरात शिफ्ट होणार आहे. त्याने मालदिवमध्ये श्वेताला प्रपोज करण्याचं ठरवलं होतं मात्र लॉकडाऊनमुळे ते होऊ शकलं नाही. हनीमूनसाठी देखील दोघं काश्मिरमधील गुलमर्गसाठी रवाना होणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे हे लग्न जवळच्या नातेवाईकांमध्येच पार पडेल. हा विवाह सोहळा मुंबईतील एका मंदिरामध्ये डिसेंबरमध्ये पार पडेल.   

aditya narayan shares his wedding plan with shweta agarwal  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT