aaditya shweta 
मनोरंजन

आदित्य नारायणने ढोलवर धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध गायक आणि  टीव्ही होस्ट आदित्य नारायण आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकतोय. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत तो सात फेरे घेणार आहे. काही दिवसांपासून त्याचे लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम आणि रितीरिवाज सुरु आहेत. या दरम्यान आदित्यचा एक व्हिडिओ व्हायल होतोय ज्यामध्ये तो स्वागताच्या वेळी नाचताना दिसतोय. 

शनिवारी आदित्यची तिलक सेरेमनी झाली होती. ज्यानंतर रविवारी मेहेंंदी आणि सोमवारी हळद होती. १ डिसेंबर म्हणजे आज मंगळवारी दोघेही विवाहबंधनाच अडकणार आहेत. आदित्यचा हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो त्याच्या लग्नसोहळ्यातील एका कार्यक्रमाचा आहे. यामध्ये आदित्य देखील नाचताना दिसतोय.

अभिनेत्री मेघना कौशिकने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर आदित्यचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यामध्ये तो डान्स करतोय. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिलंय, डीजे विथ ढोल आणि अशा प्रकारे यात नवरदेवाची एंट्री झाली. हा व्हिडिओ आदित्यने देखील त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. 

आदित्य आणि श्वेता यांचे तिलक सेरेमनीचे फोटो सोशल मिडियावर झळकले होते. या फोटोंमध्ये आदित्यच्या कपाळावर तिलक लावलेला आणि गळ्यात हार घातलेला दिसतोय. काही महिन्यांपूर्वीच आदित्यने श्वेतासोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. दोघांची लव्हस्टोरी 'शापित' सिनेमाच्यावेळी तयार झाली. या सिनेमातील एक गाणं आदित्यने एकदा त्यांचा फोटो शेअर करत लिहिलं होतं. कहा था ना ''कभी ना कभी तो मिलेंगे हम को यकीन है'' असं म्हणत त्याने श्वेता आणि त्याचा फोटो पोस्ट केला होता. ज्यावर चाहत्यांचा खूप प्रतिसाद मिळाला.   

aditya narayan shweta agarwal wedding singer dance video  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

Marathi News Live Updates : जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री भीषण अपघात; चारचाकीचा चक्काचूर, ट्रक पलटी

SCROLL FOR NEXT