Ananya Pandey Aditya Roy Kapoor affair Esakal
मनोरंजन

Aditya Roy-Ananya Panday : और प्यार हो गया! अखेर अनन्या अन् आदित्य एकमेकांच्या प्रेमात गुंग, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

सध्या बॉलिवूडमध्ये एका नव्या कपलची जोरदार चर्चा होत आहे. बॉलिवूडमधील सुपरहॉट अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या डेटिंगच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत होत्या मा६ दोघांनीही याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अनन्याचे आदित्यसोबतच्या प्रेमप्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. रिपोर्ट्समध्ये हे कपल गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच आदित्य आणि अनन्या एकत्र एका संगीत कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या जोडप्याची ही रोमँटिक म्युझिकल डेट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आता ही बातमी खरी असल्याचं समोर आलं आहे. सध्या अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

ज्याचा फोटो दोघांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघांचा चेहरा दिसत नसला तरी हे जोडपे स्पेनमध्ये एकाच ठिकाणी असल्याचे फोटोवरून स्पष्ट झाले आहे. सध्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातच पापाराझींच्या एका पेजनेही त्याचे फोटो शेयर केले आहे.

2022 मध्ये, आदित्य आणि अनन्या कृती सेनॉनच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेयरच्या बातम्या पसरल्या होत्या.

मात्र या बातमीवर दोघांनी मौन पाळले होते तरी अनेकदा दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते.

आदित्य आणि अनन्या पांडे यांच्यातील नात्याचा खुलासा सर्वप्रथम करण जोहरने त्याच्या टॉक शो कॉफी विथ करणमध्ये केला होता.

डिसेंबर 2022 मध्येही दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघेही एकत्र 'फिफा वर्ल्ड कप 2022' पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आयुषमान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये काम करत आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर आदित्य रॉय कपूर 'मेट्रो इन दिनों' मध्ये सारा अली खान दिसेल. त्याचा हा चित्रपट पुढच्या वर्षी 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT