aaditya 
मनोरंजन

रामदास पाध्येंनी आदित्य रॉय कपूरसाठी बनवला ‘थ्रीडी बोलका बाहुला’

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- दिग्दर्शक अनुराग बासु यांचा ‘लूडो’ हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता आदित्य रॉय कपूरला बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. यामध्ये हुबेहुब आदित्यसारखा दिसणारा बाहुला रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी बनवला आहे. थ्रीडी प्रिंटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसारखा दिसणारा हा बाहुला बनवला आहे.

याविषयी सांगताना रामदास पाध्ये म्हणाले, “अनुराग बासू यांना आम्ही हुबेहुब दिसणा-या बाहुल्या बनवू शकतो याची माहिती होती. ते आमच्याकडे आले तेव्हा आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या त्यांना दाखवल्या होत्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं होतं.”बोलक्या बाहुल्यांच्या कलेत ५३ वर्षांचा जबरदस्त अनुभव असलेल्या प्रसिद्ध रामदास पाध्येंच्या संग्रही २२०० पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा अनेक शोमध्येही दिसले आहेत. 

सत्यजीत सांगतात, “आदित्यची थ्रीडी बाहुली बनवताना आम्ही त्याचा थ्रीडी स्कॅन केरून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही थ्रीडी फोटो काढले. आणि मग त्यानुसार फायनल थ्रीडी प्रिंटेड बाहुला तयार केला.” आदित्यच्या चेहऱ्याची ठेवण, भुवया, आणि पापण्या यांची हालचाल या गोष्टी आव्हानात्मक होत्या. मग इथे रामदास पाध्ये यांचा अनुभव कामी आला. यानंतर आदित्यला ल्युडो या सिनेमातील भूमिकेसाठी सत्यजीत यांनी ट्रेनिंग दिलं.  

aditya roy kapurs alter ego puppet was made using 3d technology  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT