Vikram Vedha Advance Booking News Vikram Vedha Advance Booking News
मनोरंजन

Advance Booking : विक्रम वेधाची ७,८४३ तिकिटे विकली गेली; तब्बल इतकी कमाई

चेन्नई, सूरत, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक आगाऊ बुकिंग

सकाळ डिजिटल टीम

सकाळ डिजिटल टीम

Vikram Vedha Advance Booking News हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खानचा विक्रम वेधा चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग (Advance Booking) सुरू झाली आहे. हृतिक तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. हृतिक आणि सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) या चित्रपटाच्या हिट ट्रेलरने जगभरातील प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटासाठी देशभरातील प्रेक्षकांची क्रेझ पहिल्याच दिवशी चित्रपटासाठी केलेल्या आगाऊ बुकिंगवरून लक्षात येते.

विक्रम वेधाचा ट्रेलर आणि अल्कोहोलिया या गाण्याने प्रेक्षकांना चित्रपटासाठी खूप उत्सुक केले आहे. चित्रपटाला सुरुवातीच्या दिवशीच चांगला प्रतिसाद मिळू शकतो. कारण, चित्रपटाने केवळ आगाऊ बुकिंगद्वारे लाखोंची कमाई केली आहे. चित्रपटाची सुमारे ७,८४३ तिकिटे विकली गेली आहेत. अशाप्रकारे प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाने २४ लाखांपर्यंत कमाई केली आहे. तसेच आगाऊ बुकिंग (Advance Booking) अद्याप सुरू आहे.

चेन्नई, सूरत, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये चित्रपटासाठी सर्वाधिक आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये ३२ हजारांहून अधिक (५१.७९ हजार रुपये) तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली आहे. सूरतमध्ये ५.१५ लाख तिकिटांचे (६.९१ लाख), हैदराबादमध्ये २.२४ लाख तिकिटांचे (२१.७८ लाख), बेंगळुरूमध्ये ९०.३५ हजार तिकिटांचे (३.४४ लाख) आगाऊ बुकिंग करण्यात आले आहे. चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये २४ लाखांची कमाई केली आहे. या शहरांव्यतिरिक्त देशभरातील इतर शहरांमध्येही चित्रपटासाठी चांगली आगाऊ बुकिंग सुरू आहे.

सर्वोच्च आंतरराष्ट्रीय वितरणाचा विक्रम

विक्रम वेधाची क्रेझ देशभरातच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. विक्रम वेधा हा चित्रपट शंभरहून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. देशभरात या चित्रपटाचे १,२५० मल्टिप्लेक्समध्ये ॲडव्हान्स बुकिंगही सुरू आहे. आगाऊ बुकिंगला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

Kedarnath Tourism: मुंबईहून केदारनाथपर्यंत ट्रिप प्लॅन करताय? मग सर्व मार्ग आणि टिप्स जाणून घ्या एका क्लिकवर

Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

Minister Chandrashekhar Bawankule: अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

मोठी बातमी! बसचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परतताना ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT