Will Smith at the Oscars.(REUTERS) Google
मनोरंजन

Oscar 2022: विल स्मिथ 10 वर्षांसाठी 'बॅन'; काय म्हणालाय अभिनेता?

क्रिस रॉकला भर कार्यक्रमात थप्पड लगावल्यानंतर विल स्मिथविरोधात अकादमीनं मोठा निर्णय घेतला आहे.

प्रणाली मोरे

९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ख्रिस रॉक(Chris Rock)च्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथ(Will SMith)वर 'मोशन पिक्चर्स अकादमी आणि आर्ट्स' तर्फे मोठी कारवाई करणात आली. या संबंधात निर्णय घेण्यात आलेल्या बैठकीत विल स्मिथवर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यास बंदी करण्यात आली आहे. ही बंदी एक-दोन वर्षांची नाही तर तब्बल १० वर्षांसाठी घालण्यात आली आहे. या शिक्षेनंतर विल स्मिथनं पहिल्यांदाच आपलं मत यावर मांडलं आहे. तो म्हणाला आहे,''मला हे मान्य आहे आणि मी अकादमीच्या निर्णयाचा आदर करतो''.

विल स्मिथनं यंदा 'बेस्ट अॅक्टर' कॅटॅगरीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. क्रिसला थप्पड मारल्यानंतर लगेचच स्मिथ हा पुरस्कार घेण्यासाठी ऑस्करच्या मंचावर गेला होता. विल स्मिथनं आतापर्यंत अनेकवेळा ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळवलं आहे आणि गेल्या वर्षात अनेकदा त्यानं ऑस्कर पटकावला देखील आहे. पण त्यानं कधीच आतापर्यंत याचा टिंबा मिरवला नव्हता. आता थप्पड प्रकरणानंतर अकदमीनं जो बंदीचा निर्णय त्याला शिक्षा म्हणून सुनावला आहे त्यानुसार विल स्मिथ यापुढील १० वर्षांसाठी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहू शकत नाही. म्हणजे पुढील सोहळ्यात जरी त्याला नॉमिनेशन मिळाले,तो जिंकला तरी त्याला स्वतःला तो पुरस्कार मानानं मंचावर जात स्विकारता येणार नाही. खरं तर ऑस्कर पुरस्काराच्या परंपरेनुसार यावर्षी जो अभिनेता बेस्ट अॅक्टरचा अॅवॉर्ड जिकंलाय त्याला पुढील वर्षी जी अभिनेत्री 'बेस्ट अॅक्ट्रेस' अॅवॉर्ड जिंकेल तिला पुरस्कार देण्याचा मान मिळतो. पण यंदा 'किंग रिचर्ड्स'साठी 'बेस्ट अॅक्टर' चा पहिल्यांदाच पुरस्कार पटकावलेल्या विल स्मिथला पुढील वर्षी तो मान मिळणार नाही.

अकादमीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, ''खरंतर ऑस्कर म्हणजे वर्षभरात वैयक्तिक पातळीवर ज्यांनी ज्यांनी सिनेमात बहुमूल्य योगदान दिलं आहे त्यांच्या कामाचा सन्मान करणारा हा जागतिक पातळीवरचा सर्वोच्च सन्मान आहे. पण अशा सोहळ्यात जर कुणी गैरवर्तुणूक करत असेल,जी भर मंचावर सोहळ्यादरम्यान विल स्मिथनं केली तर ती अक्षम्य आहे. आम्ही ती परिस्थिती त्वरीत हाताळण्यात असमर्थ ठरलो यासाठी क्षमा मागतो. पण आता जो निर्णय आम्ही घेतला आहे तो आमच्या निमंत्रितांसाठी,पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणि अकादमीतल्या सदस्यांसाठी तसचं संपू्र्ण जगासाठी एका शिकवण ठरेल. आपण अशा पुरस्कारसोहळ्यात अधिक सतर्क आणि सजग असायला हवं हे सर्वांनाच कळेल''.

पुढे अकादमीनं म्हटलं आहे,'यापुढील १० वर्षांसाठी विल स्मिथला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. आम्ही क्रिस रॉकचे आभारी आहोत. त्यानं परिस्थिती आणखी बिघडू दिली नाही. तो शांत राहीला. त्यासाठी आम्ही मनापासून त्याचे धन्यवाद आणि आभार मानतो. विल स्मिथच्या बाबतीत आम्ही जो निर्णय घेतला आहे तो पुढील पुरस्कार सोहळ्यांसाठी फायद्याचाच ठरेल''. विल स्मिथनं अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. स्मिशनं राजीनामा दिला त्यावेळी निवेदन सादर करताना सर्वांची माफी मागितली होती. २७ मार्च,२०२२ रोजी पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान क्रिस रॉकनं विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट हिची केसांवरुन खिल्ली उडवली होती. त्यानंतर ऑस्करच्या मंचावर जाऊन विल स्मिथनं भर कार्यक्रमात क्रिस रॉकच्या कानाखाली मारली होती. त्या 'थप्पड' प्रकरणानंतर अकादमीनं हा कठोर निर्णय विल स्मिथच्या बाबतीत घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT