Ankita Lokhande Google
मनोरंजन

लग्नाला 17दिवस झाले अनं अंकिता लोखंडेसोबत घडली ही दुर्घटना...

चाहत्यांनी सोशल मीडियावर 'Get Well Soon' म्हणत व्यक्त केली तिच्याविषयीची काळजी

प्रणाली मोरे

'पवित्र रिश्ता'मुळे घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) काही दिवस इंडस्ट्रीपासून दूर होती तरी चाहत्यांच्या लख्ख लक्षात राहिली ते तिच्या सुंदर चेह-यामुळेच नाही तर तिच्या अभिनयामुळेही. खरंतर दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबतचं तब्बल सहा वर्षांचं तिचं नातं यामुळेही त्या दोघांच्या चाहत्यांमध्ये ते प्रसिद्ध होते. आणि खरंतर सुशांतसोबत झालेल्या ब्रेकअपनी मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच ती इंडस्ट्रीपासून दुरावली होती हे नंतर तिनंच सांगितलं. पण असं असतानाही सुशांत सिंग राजपूतनं जेव्हा आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतला तेव्हा मात्र तिनं मनात कोणताही रागरुसवा न ठेवता त्याच्या कुटुंबासोबत उभं राहून त्यांच्या दुःखात सहभागी झाली. पडेल ते सहकार्य केलं तेव्हा पोलिस ससेमिरा मागे लागेल म्हणून त्याच्याकडे पाठ वळवली नाही.

खरंतर सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर ती पूर्ण कोलमडली होती. बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचं स्वप्नही तिनं मागे सोडलं होतं. पण बिझनेसमन विकी जैन तिच्या आयुष्यात आला अनं तिच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळाली. विकीनं दिलेला आत्मविश्वास घेऊन तिनं पुन्हा मोठ्या जोमानं करिअरला सुरुवात केली. बॉलीवूडचे दोन सिनेमे केले. कंगनाच्या 'मणिकर्णिका' सिनेमातली तिची व्यक्तीरेखा लक्षात राहिली. आताही ती एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता २' मध्ये आपल्याला दिसतेय. पण सध्या ती पुन्हा चर्चेत आली ती तिच्या लग्नामुळे. सोशल मीडियावर तिच्या मेहेंदी,संगीत आणि लग्नाच्या फोटोंची एकच चर्चा होती.

मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तिचं विकी जैनसोबत मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. खरंतर तेव्हा लग्नाआधी तिच्या पायाला दुखापत झाली होती. लग्न पुढे ढकलले जाईल या चर्चेला उधाण आलं होतं. पण तसं झालं नाही. आता पुन्हा लग्नाला जेमतेम 17 दिवसच होत आहेत तर बिचारीच्या आयुष्यात पुन्हा वादळ आल्याची बातमी आहे. ते वादळ म्हणजे तिच्या पायाचं दुखणं बळावलंय. ती आधाराशिवाय चालू शकत नाही. पण हे सारं ती मात्र नेहमीप्रमाणे हसत हसत सहन करतेय. बघा आम्ही हा जोडलेला व्हिडीओ, लक्षात येईल आपल्या. स्पोर्टिंग स्पिरीट घेऊनच अंकिता मॅडम जन्माला आल्या आहेत याचं ते जिवंत उदाहरण आहे. तर बिचा-या अंकिताच्या आयुष्यात पाय दुखावण्याची दुर्घटना का वारंवार होतेय हे कळतच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT