sushant singh (courtesy- varindar chawla) 
मनोरंजन

आमिरनंतर आणखी एका अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम

स्वाती वेमूल

अभिनेता आमिर खानने सोमवारी सोशल मीडियाला रामराम करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियाला 'गुडबाय' करत असल्याचं जाहीर केलं. या अभिनेत्याचं नाव आहे सुशांत सिंह. सुशांतने 'द लेजंड ऑफ भगत सिंग', 'सत्या', 'दम', 'लक्ष्य' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर 'सावधान इंडिया' या क्राइम शोचं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं. सुशांतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आणि सोशल मीडिया सोडत असल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर सुशांतचा ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचं पाहायला मिळालं. 'हा अकाऊंट अस्तित्वात नाही' असा संदेश त्यावर येऊ लागला. 

'सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून ब्रेक घेतोय. रिबूट करायची गरज आहे', असं त्याने अकाऊंट बंद करण्यापूर्वी ट्विट केलं होतं. त्यानंतर हीच पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली. तर दुसरीकडे आमिरनेही सोमवारी सोशल मीडिया अकाऊंट तात्पुरते बंद केले. १४ मार्च रोजी आमिरने वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावरील शुभेच्छांचे आभार मानत त्याने सोमवारी अचानक रामराम केला. सोशल मीडिया सोडत असलो तरी प्रॉडक्शन हाऊसमार्फत आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 

याआधीही काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियाला रामराम केला. यामध्ये बॉलिवूडसोबतच मराठी कलाकारांचाही समावेश आहे. काहींनी सततच्या ट्रोलिंगला वैतागून तर काहींनी ब्रेक हवा म्हणून सोशल मीडियाला तात्पुरता 'गुडबाय' केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघानं इंग्लंडला रोखलं अन् पुढच्या फेरीतही स्थान मिळवलं! इंग्लिश संघाचं आव्हान संपलं

Deputy Collector: राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

SCROLL FOR NEXT