aryan khan cordelia cruise 
मनोरंजन

आर्यनच्या अटकेनंतर क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ व्हायरल

पार्टीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस

स्वाती वेमूल

Cordelia Cruise क्रूझवर पार्टी करण्यासाठी ड्रग्ज घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसह Aryan Khan आठही जणांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. आरोपी ड्रग्ज विक्रेत्यांच्या नियमित संपर्कात असल्याचे त्यांच्या मोबाइलवरील चॅटवरून स्पष्ट होत असल्याचा दावा एनसीबीने केला. या कारवाईनंतर सोशल मीडियावर कॉर्डेलिया क्रूझ पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्रूझवर जोरदार पार्टी होत असून त्यात तरुणवर्ग अधिक असल्याचं पहायला मिळत आहे. पार्टीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आर्यनच्या बाजूने कमेंट्स केले आहेत.

'क्रूझवर इतके लोक गेले असताना फक्त आर्यन खानलाच लक्ष्य केलं गेलं', असं एकाने म्हटलंय. तर 'इतके लोक असताना फक्त आठ जणांनाच अटक का', असा प्रश्न दुसऱ्याने विचारला आहे. ड्रग्जप्रकरणी आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना एनसीबीने अटक केली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

क्रूझवरच्या पार्टीला अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि त्याची मित्रमंडळी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबीकडे होती. त्यानुसार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला होता. शनिवारी आर्यन खान आणि अरबाझ प्रवेशद्वारावर आले. त्यावेळी अरबाजकडे सहा ग्रॅम चरस सापडले. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, पण त्याने ड्रग्जचं सेवन केलं होतं. त्यामुळे दोघांनाही क्रूझवर चढण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलं. तर मुनमुन हिच्या बॅगेत पाच ग्रॅम चरस सापडले. या तिघांसोबत त्यांचे मित्र क्रूझवरच होते. त्यांच्याकडेही काही ड्रग्ज मिळण्याची शक्यता असल्याने एनसीबीचे अधिकारी क्रूझवर चढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT