mahabharat 
मनोरंजन

छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका आता होणार खाजगी वाहिनीवर प्रसारित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः लॉकडाऊनमुळे चित्रीकरण ठप्प झालं अन् संपूर्ण कलाविश्वाचंच गणित कोलमडलं. चित्रपट, मालिका, वेबसीरिज विश्वाला याचा जबरदस्त फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये छोट्या पडद्यावरील मालिकांचे नवे एपिसोड दाखवण्यात आले. पण नंतर लॉकडाऊन वाढवण्यात आले आणि चित्रीकरणच पूर्णपणे बंद असल्यामुळे वाहिन्यांनी मालिकांचे झालेले भाग दाखवायला सुरुवात केली. दरम्यान प्रेक्षकांकडून एक वेगळीच मागणी होऊ लागली. जुन्या गाजलेल्या मालिकांचे पुनःप्रसारण करावे अशी मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. प्रेक्षकांची ही मागणी वाहिन्यांनी पूर्ण केली. 'महाभारत', 'रामायण', 'शक्तीमान', 'हम पाच' सारख्या जुन्या मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता या जुन्या मालिकाच टिआरपीच्या शर्यतीमध्ये पुढे आहेत. 

'महाभारत', 'रामायण' या मालिकांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलंय.  'रामायण'ने तर टिआरपीचे सारे रेकॉर्डस् ब्रेक केले आहेत. आता प्रेक्षकांसाठी आणखी एक खुशखबर आहे. 'महाभारत'ची वाढती लोकप्रियता पाहता हिंदी कलर्स वाहिनीने एक निर्णय घेतला आहे. ही मालिका आता हिंदी कलर्स वाहिनीवरही प्रसारित होणार आहे. हिंदी कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

4 मेपासून ही मालिका हिंदी कलर्स वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. 80-90च्या दशकात बी.आर.चोप्रा आणि रामानंद सागर यांनी 'महाभारत', 'रामायण' सारख्या मालिका तयार केल्या. या मालिका त्या काळातील सुपरहिट मालिका होत्या. आता पुन्हा एकदा याच मालिकांचा दबदबा पाहायला मिळत आहे.

या मालिकांमधील कलाकारही बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. मुकेश खन्ना, रुपा गांगुली, गजेंद्र चौहान सारख्या कलाकारांनी  'महाभारत'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आपल्या या जुन्या मालिकांना आताची पिढीही तितकाच प्रतिसाद देत आहे हे पाहून या मालिकेतील कलाकारांनाही आभाळाएवढा आनंद होत आहे. इतक्या वर्षानंतरही या मालिकांना मिळत असलेली लोकप्रियता खरंच कौतुकास्पद आहे. 

after dd bharti mahabharata will now be broadcast on colors tv

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT