After Deleting All Instagram Posts, Adnan Sami Shares Another One Titled "Alvida" Google
मनोरंजन

अदनान सामी म्हणाला 'अलविदा', काय झाले अचानक गायकाला, जाणून घ्या सविस्तर

काही दिवसांपूर्वी अदनाननं अलविदा म्हणत सोशल मीडियावरच्या पोस्ट डीलिट केल्या होत्या. आता पुन्हा अलविदा म्हणत त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

हिंदी सिनेइंडस्ट्रीचा प्रसिद्ध गायक अदनान सामीनं(Adnan Sami) तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडलं जेव्हा त्याने इन्स्टाग्रामवरचे(Instagram) सगळे पोस्ट(Post) डिलीट(Delete) केले. त्याच्या अकाऊंटवर फक्त अलविदा लिहिलं होतं. आणि हे पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले होते. पण आता अदनानं एक नवी पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे की,त्यानं असं नेमकं का केलं होतं. आणि त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे.(After Deleting All Instagram Posts, Adnan Sami Shares Another One Titled "Alvida")

अदनान सामीने इन्स्टाग्रामवर एक नवी पोस्ट शेअर केली आहे. हा त्याच्या नवीन अलविदा गाण्याचा टीझर आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,'माझ्या म्हणण्याचा उद्देश होता A...L...V...I...D...A!'

आता अदनानच्या या नव्या पोस्टला पाहून त्याच्या चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कारण आता त्यांना कळलं आहे की ही फक्त गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी लढवलेली शक्कल होती. अदनानने आपलं नवीन गाणं अलविदाचं प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया अकाऊंटवरनं सगळे पोस्ट डिलीट केले होते.

Adnan Sami च्या या नव्या पोस्टवर त्याचे चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, 'सर तुम्ही तर घाबरवलं आम्हाला. मला वाटलं काय झालं तुम्हाला, तुम्ही कुठे जाऊ नका आम्हाला सोडून'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं आहे,'खूप मस्त, इतकं छानं गाणं शेअर केल्याबदद्दल धन्यवाद'.

अदनान सामीने काही दिवस आधी मालदीवहून आपले काही फोटो शेअर केले होते, त्याची हेल्थ पाहून त्यावेळी चाहते शॉक झाले होते. तो खूपच फिट दिसत होता. त्यानं आपल्या वजनावर खूपच नियंत्रण मिळवलं होतं.

अदनान सामीने सुन जरा, शायद यही प्यार है, जान मेरी जा रही सनम, हम दीवाने सारखी सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याला पद्मश्री पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

सुपरस्टार अभिनेता Vijay Deverakonda च्या कारचा भीषण अपघात! नेमकं काय घडलं? पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Georai Nagarparishad Election : बीडमधील गेवराईचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; गीता पवार, शितल दाभाडे दावेदार

Raju Shetty : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी मान्य केली; मग कारवाई का नाही

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT