welcome 3. akshay kumar, nana patekar, anil kapoor, hera pheri 3
welcome 3. akshay kumar, nana patekar, anil kapoor, hera pheri 3 SAKAL
मनोरंजन

भगवान का दिया हुआ सबकुछ है.. Hera Pheri 3 नंतर आता अक्षय- नाना - अनिलचा Welcome 3 येतोय

Devendra Jadhav

Welcome 3 News: हेरा फेरी ३ च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी यांनी मुंबईत हेरा फेरी ३ च्या शूटिंगला सुरुवात केलीय. आता आणखी एका सुपरहिट कॉमेडी सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो म्हणजे वेलकम ३.

२००७ ला आलेल्या वेलकम सिनेमाने सर्वांना खळखळून हसवलं. २०१५ साली वेलकमचा सिक्वेल आला. अक्षय कुमारच्या जागी जॉन अब्राहम वेलकम २ मध्ये दिसला.

(After Hera Pheri 3, Akshay-Nana-Anil's Welcome 3 is coming )

बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, 'वेलकम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाला आधी 'वेलकम टू द जंगल' असे म्हटले जात होते.. पण आता या चित्रपटाचे नाव 'वेलकम 3' असणार आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट फिरोज नाडियादवालाचा असेल.

या चित्रपटात मुन्ना भाई म्हणजेच संजय दत्त, सर्किट म्हणजेच अर्शद वारसी आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे जर प्रत्यक्षात घडल्यास अक्षय कुमारचा 'हेरा फेरी 3' नंतरचा हा दुसरा बॅक टू बॅक कॉमेडी चित्रपट असेल.

'हेरा फेरी 3' ची शूटिंग अंतिम टप्प्यात आल्यावर आणि हेरा फेरी ३ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच 'वेलकम 3'चे शूटिंग सुरू होईल. वेलकम ३ चं दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही. अक्षय कुमार 'वेलकम 2' मध्ये नव्हता.

पण आता वेलकम ३ च्या माध्यमातून अक्षय कुमार पुन्हा वेलकम सिरीजमध्ये कमबॅक करतोय. वेलकम ३ मध्ये अक्षय कुमार, अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका असतील.

अशाप्रकारे अक्षय कुमारचे हेरा फेरी ३ आणि वेलकम ३ हे दोन्ही सिनेमे पुढच्या वर्षी २०२४ ला रिलीज होण्याची दाट शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT