after Ludo will audiences be pleased with Abhishek bacchan get chief minister role in dasavi movie  
मनोरंजन

अभिषेक दहावी नापास भ्रष्ट 'मुख्यमंत्र्यांच्या' भूमिकेत  

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  लूडो मध्ये अभिषेक बच्चनच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यावरुन त्याचे कौतूकही झाले. चित्रपटात चमकदार कामगिरी करण्यासाठी धडपडणा-या अभिषेकच्या वाट्याला म्हणावे असे यश अद्याप आलेले नाही. तो अजूनही चाचपडतो आहे. त्याच्या लूडो मधल्या भूमिकेनंतर तो आता एका चित्रपटात चक्क मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत काम करताना दिसणार आहे. राजकारण या विषयावर आधारलेल्या या चित्रपटाची कथा अभिषेकला आवडली होती. त्यानं आपण ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

अभिषेक आगामी काळात अन्नपूर्णा यांच्या 'बॉब बिस्वास' चित्रपटात दिसणार आहे.  अभिषेकनं गेल्या वर्षी अनुराग बसु दिग्दर्शित लूडो चित्रपटात बटूकेश्वर तिवारीची भूमिका साकारली होती. ती प्रेक्षकांना आवडली. अभिषेकवर कौतूकाचा वर्षाव झाला. त्यामुळे अभिषेकला त्याच्या आवडीची एक भूमिका करण्याची ऑफर आली. त्यानं ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिषेकचे करिअर हे संथ गतीनं पुढे सरकताना दिसत आहे. त्याच्या बटूकेश्वरच्या भूमिकेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आला. कोरोनाच्या काळात अनुराग बसू दिग्दर्शित लूडो चित्रपट प्रदर्शित झाला होता. आगळ्या वेगळ्या विषयावर प्रभावी मांडणी असणा-या य़ा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आता अभिषेकला एका वेगळ्या भूमिकेत काम करायचे आहे.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दिग्दर्शक तुषार जलोटा यांच्या दसवी नावाच्या एका चित्रपटात अभिषेक एका भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकारण, भ्रष्टाचार हा या चित्रपटाचा मुख्य विषय असणार आहे. त्याला थोडी मनोरंजनाची फोडणी देण्यात आली आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तो दहावी नापास अशा मुख्यमंत्र्यांची भूमिका करणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व हा विषय हाताळण्यात आला आहे. नेत्याला शिक्षण किती गरजेचे आहे हे या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिषेकच्या या नव्या चित्रपटासाठी दिल्ली ते आगरा या भागात चित्रिकरण होणार आहे. अभिषेकच्या जोडीला यामी गौतमही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच निम्रत कौरही एक महत्वाची भूमिका चित्रपटात साकारत आहे. अशी चर्चा आहे की, दसवी चित्रपटाचे चित्रिकरण हे 22 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अभिषेकला दसवीचे कथानक अतिशय आवडले आहे. त्यामुळे हा चित्रपट करण्यासाठी तो कमालीचा उत्सुक आहे. दसवी चित्रपटाशिवाय अभिषेककडे 'बॉब बिस्वास' (Bob Biswas) आणि 'द बिग बुल' (The Big Bull) सारखे चित्रपटही असून त्यात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. हे दोन्ही चित्रपट या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता निर्मात्यांनी वर्तवली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT