Sherlyn Chopra, Sherlyn Chopra news, Sherlyn Chopra affair SAKAL
मनोरंजन

Sherlyn Chopra: राज कुंद्रा नंतर अभिनेत्री शर्लिनने एका फायनान्सर विरोधात केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

जुहू पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे

Devendra Jadhav

Sherlyn Chopra News: अभिनेत्री शर्लिन चोप्राने एका फायनान्सर विरोधात जुहू पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे.

या फायनान्सरने एका व्हिडिओ रेकाॅर्डिंगसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने जवळीकता साधत चुकीचा स्पर्श केला असल्याचा दावा तिने केलाय.

या गोष्टीला शर्लिनने विरोध केला असताना फायनान्सरने शर्लिनला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली.

(After Raj Kundra, actress Sherlyn chopra files molestation case against a financier)

शर्लिनने विरोध केल्यावर आरोपीला राग अनावर झाल्याने आणि त्याने शर्लिनला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली.

या प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सुनिल लोढा विरोधात जुहू पोलिस ठाण्यात कलम ३५४, ५०६,५०९ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याआधी सुद्धा शर्लिन चोप्रा चर्चेत अली होती. साजिद खान जेव्हा बिग बॉस १६ च्या घरात गेला आहे तेव्हापासून शर्लिन चोप्राचे रक्त खवळले होते. तिने साजिद विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता.

याशिवाय शर्लिनच्या पोर्न व्हिडिओज माझ्याकडे आहेत असा आरोप राखीने केला होता. याशिवाय याआधी शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर देखील आरोप केला होता.

शर्लिनने ऑक्टोबर 2021 मध्ये राज कुंद्रा आणि पत्नी शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांवर गुन्हा आणि मानसिक छळाचे आरोप ठेवण्यात आले होते. राजला पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

तो सध्या जामिनावर बाहेर आहे. पुढे राज आणि शिल्पाने शर्लिनवर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

शर्लिने जाहीर माफी मागावी अशीही मागणी केली होती. आता शर्लिनने सुनील लोढा केलेल्या तक्रारीविरोधात पोलीस काय ऍक्शन घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT